Join us

‘नीरजा’ पाहण्याावरून अर्जुनची दुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 08:30 IST

रिअल लाईफ बायोपिक ‘नीरजा’ चित्रपटातील सोनमच्या जबरदस्त अभिनयाची सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स आफिसवरही चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे....

रिअल लाईफ बायोपिक ‘नीरजा’ चित्रपटातील सोनमच्या जबरदस्त अभिनयाची सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स आफिसवरही चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे.‘नीरजा’ पाहण्यासाठी सर्वांना उत्सुकता असताना; मात्र अर्जुन कपूरच्या मनात हा चित्रपट पाहण्याबद्दल दुविधेची स्थिती आहे.नुकतेच ट्विटरवर त्याने एक व्हिडियो अपलोड करून यामागचे कारण सांगितले. तो म्हणतो, प्रियजणांपासून दूर होण्याची मला सर्वात जास्त भीती वाटते. मग ते खºया आयुष्यात असो किंवा फिल्ममध्ये. त्यामुळे सोनमचा चित्रपट पाहण्यासाठी माझे एक मन धजावत नाही. परंतु सोनम तू असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट स्वीकरण्याचे धाडस दाखवल्यामुळे मला तुझा अभिमान आहे. प्रत्येक चित्रपटागणिक तुझा अभिनय नव्या उंचीवर जातोय.}}}}