Join us

​अर्जून म्हणतो, अथिया माझी केवळ मैत्रिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 17:28 IST

बी-टाऊनमध्ये लींक-अप, बे्रकअपच्या बातम्या नव्या नाहीत. अलीकडे आपण सगळेच अर्जून कपूर आणि अथिया शेट्टी यांच्या वाढत्या मैत्री(??)च्या बातम्या ऐकतो ...

बी-टाऊनमध्ये लींक-अप, बे्रकअपच्या बातम्या नव्या नाहीत. अलीकडे आपण सगळेच अर्जून कपूर आणि अथिया शेट्टी यांच्या वाढत्या मैत्री(??)च्या बातम्या ऐकतो आहोत. अर्जून-अथिया अलिकडे बºयाच फिल्मी पार्टींमध्ये एकत्र दिसले. यावरून त्यांच्यात काही शिजत तर नाहीयं, अशी शंका येणे साहजिक आहे. अखेर एका मुलाखतीत खुद्द अर्जून कपूरलाच त्याच्या व अथियाच्या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आले. यावर अर्जून काय सांगणार...तो नाहीच म्हणाला. होय, अथिया केवळ माझी चांगली मैत्रिण आहे, असे अर्जूनने सांगितले.  अथिया माझीच नाही तर माझी बहिण अंशूलाचीही मैत्रिण आहे. आम्ही अलीकडे एकत्र दिसतोय, म्हणून मीडियाने आमच्याबद्दल तर्कवितर्क बांधणे सुरु केलेय. पण ती माझी मैत्रिण आहे. बाकी सगळ्या अफवा, असेही अर्जूनने स्पष्ट केला. वेल, अर्जून...तू म्हणतोय म्हणजे आम्हाला विश्वास ठेवायलाच हवा...होय ना?