अर्जूनने सलमानशी घेतला पंगा, आता टाळू लागलेतं दिग्दर्शक!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 13:44 IST
सलमान खानशी बॉलिवूडमधले बडे बडे पंगा घ्यायला घाबरतात. पण अर्जून कपूरने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष का होईना सलमानशी पंगा घेतलाच. आता ...
अर्जूनने सलमानशी घेतला पंगा, आता टाळू लागलेतं दिग्दर्शक!!
सलमान खानशी बॉलिवूडमधले बडे बडे पंगा घ्यायला घाबरतात. पण अर्जून कपूरने प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष का होईना सलमानशी पंगा घेतलाच. आता या दोघांमध्येही कोल्ड वॉर सुरु झाल्याची खबर आहे. आता सलमानशी पंगा म्हटल्यावर याचे काही परिणाम अर्जूनला भोगावेच लागणार. सूत्रांचे मानाल तर सध्या अर्जून हेच परिणाम भोगतोयं. अनेक दिग्दर्शक अर्जूनकडे दुर्लक्ष करू लागलेत, हा त्याचाच परिणाम मानला जात आहे. आता अर्जून व सलमानच्या कोल्ड वॉरचे कारण काय? तर मलायका खान. होय, सलमानचा भाऊ अरबाज खान याची एक्स वाईफ मलायका अरोरा हिच्यासोबतची अर्जूनची मैत्री या कोल्ड वॉरचे कारण ठरलीयं. अर्जूनमुळेच अरबाज आणि मलायकाचे नाते संपुष्टात आल्याची चर्चा मध्यंतरी बॉलिवूडमध्ये रंगली होती. सूत्रांच्या मते, ही बातमी जेव्हा सलमानच्या कानावर गेली तेव्हा तो लगेच अर्जूनला जाऊन भेटला होता. मात्र अर्जूनने असे काहीही नसल्याचे सलमानला स्पष्टपणे सांगितले होते. यामुळे सलमान काहीसा शांतही झाला होता. पण आता मलायकाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला म्हटल्यावर अर्जून व तिच्या मैत्रीची पुन्हा जोरदार चर्चा सुरु झालीय. इकडे मलायका व अर्जून यांची मैत्री बहरलीय आणि तिकडे सलमानचा पारा चढत असल्याचे दिसतेय. सलमानला त्याच्या कुटुंबाकडे कुणी नजर वाकडी करून बघिलेलेही आवडत नाही. अर्जूनने तर त्याच्याशी थेट पंगा घेतलाय. यामुळेच दिग्दर्शक अर्जूनला टाळू लागलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जूनसोबत काम करू नका, असे सलमानने कुणालाही सांगितलेले नाही. खरे तर त्याला हे बोलून सांगण्याची गरजही नाही. पण अनेक दिग्दर्शक अर्जूनला टाळू लागलेत. कारण यापैकी कुण्याही दिग्दर्शकाला सलमानला दुखावण्याची इच्छा नाही. अर्जूनचे वडिल बोनी कपूर सलमानचे चांगले मित्र आहे. निर्माता म्हणून बोनी कपूरचे करिअर गटांगळ्या खात असताना सलमानने त्यांची मदत केली होती. एक पैसाही न घेता बोनी कपूरच्या‘नो एन्ट्री’मध्ये काम करण्यास सलमान तयार झाला होता. आता अर्जून व मलायकाच्या मैत्रीमुळे बोनी कपूरचे सलमानशी असलेले नातेही धोक्यात दिसू लागले आहे. सूत्रांच्या मते, बोनी कपूर यांनीही अर्जूनला मलायकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आता हा सल्ला अर्जून किती मनावर घेतो, ते बघूच!!