अर्जुन म्हणतोय,‘कॉमेडी चित्रपट साकारायचाय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 11:46 IST
अर्जुन कपूरने बॉलीवूडमध्ये चार वर्षे पूर्ण केलीत. सध्या तो ‘की अॅण्ड का’ चित्रपटाचे यश उपभोगतोय. तसेच ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये ...
अर्जुन म्हणतोय,‘कॉमेडी चित्रपट साकारायचाय’
अर्जुन कपूरने बॉलीवूडमध्ये चार वर्षे पूर्ण केलीत. सध्या तो ‘की अॅण्ड का’ चित्रपटाचे यश उपभोगतोय. तसेच ‘हाफ गर्लफ्रेंड’ मध्ये श्रद्धा कपूरसोबत शूटिंग करणार आहे. त्याचा दिवसेंदिवस वाढत जाणारा आत्मविश्वास आणि अभिनयातील अनुभवामुळे त्याला चांगले चित्रपट येत आहेत.तो म्हणतो की, मी आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयावरील भूमिका केल्या. पण कॉमेडी चित्रपट करण्यासाठी अक्षरश: तळमळतो आहे. पण मला कुणाी आॅफरच करत नाही. एक कलाकार म्हणून मी फनी आणि सीरियस होऊ शकतो. मला वेगवेगळया भूमिका करायला नक्कीच आवडतात. पण, असं असतं ना की, एखादी भूमिका आपली ड्रीम रोल असतो. तसा माझ्यासाठी माझा कॉमेडी रोल असणार यात काही शंका आहे का?