Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीपासून विभक्त झालेल्या अर्जुन रामपालने वाढवली 'या' अभिनेत्रीशी जवळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2018 11:02 IST

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया याचा नुकताच घटस्फोट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगळे राहत ...

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया याचा नुकताच घटस्फोट झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगळे राहत होते. अर्जुन आणि मेरहच्या घटस्फोटा मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिडिया रिपोर्टनुसार अर्जुन रामपालची मैत्री 'डीजे वाले बाबू' गाण्यातील डान्सर नाताशा स्टेनकोविक हिच्यासोबत वाढते आहे. नताशाने अर्जुन रामपालच्या 'सत्याग्रह' आणि 'डॅडी' चित्रपटात डान्सचा जलवा दाखवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नताशा आणि अर्जुनची पहिली ओळख 'सत्याग्रह'च्या सेटवर झाली. मात्र दोघांमध्यली खरी मैत्री डॅडीच्या सेटवर बहरली. याआधी सुजैन खानमुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. मात्र काही तरी वेगळीच चर्चा रंगताना दिसते आहे. अर्जुन आणि मेहरने विभक्त होताना संयुक्तपणे एक पत्रक जारी केले होते. यात त्यांनी लिहिले होते की,  ‘२० वर्षांचा सुंदर प्रवास आणि गोड आठवणीनंतर आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित वेगवेगळ्या वाटा निवडण्याची वेळ आली आहे. इथपर्यंत आम्ही पोहोचलो पण इथून पुढे आम्हाला एक नवा प्रवास सुरू करायचा आहे. आम्ही दोघेही अतिशय खासगी आयुष्य जगत आलो आहोत. विभक्त होण्याचा निर्णय जाहिर करतानाही विचित्र भासत आहे.  पण आमच्या आयुष्यातील परिस्थितीच अशी आहे की, जिथे सत्य विकृत होण्याचा धोका आहे. आम्ही विभक्त होत असलो तरी आमच्या मनातील एकमेकांप्रतिचा आदर, प्रेम कायम असेल. नेहमी एकमेकांसाठी आम्ही उभे असू. आमच्या दोन्ही मुली महाइका आणि मायरा यांच्यासाठीची आमची कर्तव्ये आम्ही एकत्रित निभवू. नाती संपू शकतात पण प्रेम कधीच संपू शकत नाही. आमचे खासगीपण जपण्यासाठी आभार. आम्ही यानंतर कधीच याविषयावर बोलणार नाही.'' १९९८ मध्ये अर्जुन व मेहर यांनी लग्न केले होते. दोघांनाही महाइका व मायरा नावाच्या दोन मुली आहेत. महाइका १६ वर्षांची आहे. तर मायरा १३ वर्षांची आहे.