Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन रामपालच्या आईचे निधन! गर्लफ्रेन्डने दिला आधार, एक्स-वाईफही पोहोचली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 09:49 IST

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आई ग्वेन रामपाल यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्या स्तनाच्या कर्करोगाने पीडित होत्या. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची आई ग्वेन रामपाल यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्या स्तनाच्या कर्करोगाने पीडित होत्या. काल संध्याकाळी उशीरा न्यू वरळी येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. चार वर्षांपूर्वी ग्वेन रामपाल यांना ट्रिपल निगेटीव्ह ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. 

गत जुलैमध्ये अर्जुनने आपल्या ट्विटर हँडलवर आईने कॅन्सरशी असलेली लढाई जिंकल्याचे जाहिर केले होते. पण काल मृत्यूशी असलेली झुंज त्या हरल्या आणि त्यांनी अंतिम श्वास घेतला.

या शोकाकुल वातावरणात अर्जुन रामपालला आधार द्यायला त्याची गर्लफ्रेन्ड गॅबरिला हजर होती. ती पूर्णवेळी अर्जुनसोबत दिसली. अर्जुन व गॅबरिला दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. 

अर्जुनची पूर्वाश्रमीची पत्नी मेहर ही सुद्धा आपल्या दोन मुलींसह यावेळी दिसली. याचवर्षी मे महिन्यांत अर्जुन आणि मेहर यांनी आपले २० वर्षे जुने नाते संपवत, घटस्फोट घेतला.

टॅग्स :अर्जुन रामपाल