Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएलाने मुलाच्या जन्मानंतर ११ दिवसांत केले वजन कमी, फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 19:41 IST

बाळ होऊन काहीच दिवस झाल्यानंतर गॅब्रिएलाने तिचे वजन चांगलेच कमी केले आहे. तिने वर्कआऊटनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ठळक मुद्देहा फोटो माझ्या मुलाच्या जन्मानंतर ११ दिवसानंतर काढण्यात आला आहे. मी सगळ्यांना एवढेच सांगेन की, गरोदरपणात देखील व्यायाम करणे सोडू नका... गरोदरपणात योगा करण्याचा मला खूपच चांगला फायदा झाला. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल नुकताच तिसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने १८ जुलैला एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्माने अर्जुन आणि गॅब्रिएला जाम खुश आहेत. अर्जुन आणि गॅब्रिएलाच्या मुलाचे नामकरणही झाले असून मुलाच्या जन्माच्या १० दिवसांनंतर अर्जुनने त्याचा एक क्यूट फोटो शेअर करत, त्याच्या नावाची घोषणा केली होती. 

त्याने एक फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले होते की, ‘याने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणले. आमच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला. याच्या येण्याने आमचे जग नव्या रंगांनी न्हाऊन निघाले. ज्युनिअर रामपाल तुझे आमच्या आयुष्यात स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी आभार. एरिक रामपालकडून तुम्हा सर्वांना हॅलो, ’ या पोस्टमुळे अर्जुन आणि गॅब्रिएलाने आपल्या बाळाचे नाव ‘एरिक’ ठेवल्याचे सगळ्यांना कळले.

बाळ होऊन काहीच दिवस झाल्यानंतर गॅब्रिएलाने तिचे वजन चांगलेच कमी केले आहे. तिने वर्कआऊटनंतरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत ती एकदम फिट दिसत असून तिचा हा फोटो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिने खरंच काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. 

गॅब्रिएलाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचा एक सेल्फी शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, हा फोटो माझ्या मुलाच्या जन्मानंतर ११ दिवसानंतर काढण्यात आला आहे. मी सगळ्यांना एवढेच सांगेन की, गरोदरपणात देखील व्यायाम करणे सोडू नका... गरोदरपणात योगा करण्याचा मला खूपच चांगला फायदा झाला. 

गॅब्रिएला ही अर्जुनची गर्लफ्रेन्ड असून दोघांचे अजून लग्न झालेले नाही. अर्जुन आणि त्याची पत्नी मेहर यांचा अद्याप कायदेशीररित्या घटस्फोट झाला नसून अर्जुन गॅब्रिएलासोबत रिलेशनशीपमध्ये आहे.   

अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. मेहर जेसिका आणि अर्जुनने एकमेकांसोबत २० वर्ष संसार केला. पत्नी मेहर जेसिकासोबत विभक्त झाल्यानंतर अर्जुन गॅब्रिएलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघे एकत्र दिसू लागले.

टॅग्स :अर्जुन रामपाल