Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अर्जुन रामपालसाठी आपआपसात भिडल्या मेहर अन् सुझैन खान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 12:36 IST

हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुझैन खान ही अलीकडे एका पार्टीतून रागारागात बाहेर पडली. आता या बातमीची चर्चा साहजिक होणारच. काही ...

हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुझैन खान ही अलीकडे एका पार्टीतून रागारागात बाहेर पडली. आता या बातमीची चर्चा साहजिक होणारच. काही तासांतच ही बातमी बॉलिवूडमध्ये सर्वत्र पसरली. आता सुझैनच्या या संतापामागचे कारण तर जाणून घ्यायलाच हवे? कारण होते, मेहर जेसिया हिच्यासोबतचे भांडण. आता, ही मेहर जेसिया कोण? हे पण तुम्हाला सांगायलाच हवे. ही मेहर जेसिया म्हणजे, अभिनेता अर्जुन रामपालची पत्नी. (आता या भांडणाच्या कारणाचा नेमका अंदाज तुम्हाला आलाच असेल...)ही घटना आहे, फरदीन खानच्या घरच्या पार्टीतील. फरदीनने अलीकडे त्याचा खास मित्र आदित्य गगवारे आणि रेनू चेनानी यांच्यासाठी प्री-वेडिंग पार्टी ठेवली होती. या पार्टीत सोनाक्षी सिन्हा, सोहेल खान, सुझैन खान, जायेद खान, चंकी पांडे आणि मेहर जेसिया असे सगळे जण पोहोचले होते. पार्टी ऐन रंगात आली असतानाच असे काही घडले की सगळाच ‘रंग में भंग’ झाला. होय, सुझैन व मेहर यांच्यात कशावरून (सूत्रांच्या मते, अर्जूनवरून)तरी बिनसले आणि मग दोघीही एकमेकींवर अक्षरश: तुटून पडल्या. हे भांडण इतके विकोपाला पोहोचले की, दोघीही कुणालाच ऐकेनात. अनेकांनी दोघींना आवरण्याचे प्रयत्न केलेत. पण दोघीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. सुमारे अर्धा तास हे भांडण सुरु राहिले. अखेर मेहर पार्टी सोडून निघून गेली आणि तिच्या पाठोपाठ सुझैनेही  लालबुंद होत पार्टी सोडली.आता या भांडणाच्या कारणावर येऊ यात. कारणाचा अंदाज तुम्हालाही आला असेलच. मध्यंतरी  सुजैन व अर्जुनची वाढती जवळीक बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. दोघांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या बातम्या चांगल्याच गाजल्या होत्या. तेव्हापासून अर्जुनची पत्नी मेहर व सुझैन एकमेकींकडे बघणेही पसंत करत नाही. कदाचित यावरूनच दोघींमध्ये वाजले असावे.