Join us
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेन्ड गॅबरिलासोबत  Live Inमध्ये राहणार अर्जुन रामपाल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 10:53 IST

होय, गेल्या काही दिवसांत अर्जुन व त्याची ही गर्लफ्रेन्ड  बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तिचे नाव आहे गॅबरिला.

ठळक मुद्देअर्जुन सध्या ‘द फायनल कॉल’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने गतवर्षी पत्नी मेहर जेसिका हिच्यासोबत घटस्फोट घेतल्याचे जाहिर केले होते.  खरे तर अगदी सुरुवातीला या घटस्फोटासाठी हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान हिला कारणीभूत ठरवण्यात आले होते. अर्जुनमुळेच सुजैनने हृतिकसोबत घटस्फोट घेतला, अशीही चर्चा होती. पण आता सगळे काही स्पष्ट झाले आहे. अर्जुनच्या आयुष्यात सुजैन नाही तर दुसरीच एक तरूणी आहे. होय, गेल्या काही दिवसांत अर्जुन व त्याची ही गर्लफ्रेन्ड  बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तिचे नाव आहे गॅबरिला. आताश: अर्जुन व गॅबरिलाचे नाते बरेच पुढे गेले आहे. केवळ इतकेच नाही तर आता दोघेही पाली हिलच्या एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले आहेत.

स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन व गॅबरिला दोघांनीही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.  पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन  मॉडेल गॅबरिलात गुंतला. हळूहळू दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. यानंतर अनेक इव्हेंटला दोघेही एकत्र दिसू लागलेत. अर्थात दोघांनीही आपले रिलेशनशिप मान्य केले नाही. पण त्यांच्या फोटोंनी सांगायचे ते सांगितले. आता अर्जुन व गॅबरिला एकत्र राहणार म्हटल्यानंतर त्यांचे नाते पुढे कुठल्या वळणावर जाते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

तूर्तास दोघांच्या लग्नाचीही चर्चा जोरात आहे. याचवर्षी दोघेही लग्न करणार, असे मानले जात आहे. गॅबरिला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ‘सोनाली केबल’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.  यानंतर गॅबरिला काही म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली. अर्जुनबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘द फायनल कॉल’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे.

टॅग्स :अर्जुन रामपाल