बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याने याचवर्षी पत्नी मेहर जेसिका हिच्यासोबत घटस्फोट घेतल्याचे जाहिर केले होते. २० वर्षांच्या आनंदी प्रवासानंतर आमचा हा प्रवास दोन वेगवेगळ्या वाटांकडे निघाला आहे. आता दोन वेगवेगळ्या वाटा निवडण्याची योग्य वेळ आलीय, असे अर्जुन व मेहर यांनी संयुक्तपणे म्हटले होते. खरे तर अगदी सुरुवातीला या घटस्फोटासाठी हृतिकची एक्स वाईफ सुजैन खान हिला कारणीभूत ठरवण्यात आले होते. अर्जुनमुळेच सुजैनने हृतिकसोबत घटस्फोट घेतला, अशीही चर्चा होती. पण आता सगळे काही स्पष्ट झाले आहे. अर्जुनच्या आयुष्यात सुजैन नाही तर दुसरीच एक तरूणी आहे. होय, गेल्या काही दिवसांत अर्जुन व त्याची ही गर्लफ्रेन्ड बिनधास्तपणे मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे.
अर्जुनच्या या गर्लफ्रेन्डचे नाव आहे गॅबरिला. पेशाने मॉडेल असलेल्या गॅबरिलाच्या पे्रमात अर्जुन आकंठ बुडाला आहे. कालच मुंबईत अर्जुन व गॅबरिला हातात हात घालून फिरताना दिसले.