Join us

OMG!  सनी लिओनीच्या मोबाईल नंबरने उडवली युवकाची झोप, नोकरीही आली धोक्यात!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 13:21 IST

होय, सनीने मोबाईल नंबर शेअर केला आणि दिल्लीतील या युवकाचा फोन खणखणू लागला.

ठळक मुद्दे‘अर्जुन पटियाला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यात सनी कॅमिओ रोलमध्ये आहे.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिच्या मोबाईल नंबरने सध्या एका युवकाची रात्रीची झोप उडाली आहे. होय, सनीने मोबाईल नंबर शेअर केला आणि दिल्लीतील या युवकाचा फोन खणखणू लागला. इतका की, त्याच्या मोबाईलवर दिवसभरात 500 पेक्षा अधिक कॉल खणखणू लागले. मी सनी लिओनी नाही. हा सनी लिओनीचा नंबर नाही, हे सांगून सांगून तो थकला. पण कॉल थांबेनात.  

कॉलचे हे प्रकरण सुरु झाले तर ‘अर्जुन पटियाला’ या चित्रपटातील एका सीनपासून. ‘अर्जुन पटियाला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यात सनी कॅमिओ रोलमध्ये आहे. या चित्रपटात सनी एका पोलिस कर्मचा-याला तिचा मोबाईल नंबर सांगते. पण योगायोगाने हा मोबाईल नंबर दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करणा-या सीनिअर एक्झिक्युटिव्हचा निघाला. पुनीत अग्रवाल त्याचे नाव. यानंतर देशातूनच नाही तर विदेशातून पुनीतच्या मोबाईलवर कॉल येण्याचा ‘सिलसिला’ सुरु झाला.

पुनीतला पहिला फोन कॉल आला. हा कॉल उचलताच पलीकडच्या व्यक्तिने अश्लिल बोलणे सुरु केले. तुला हा नंबर कुठून मिळाला, असे पुनीतने विचारल्यावर खुद्द सनी लिओनीनेच ‘अर्जुन पटियाला’मध्ये हा नंबर सांगितल्याचे पलीकडून बोलणा-या व्यक्तिने त्याला सांगितले. तेव्हा कुठे पुनीतला याप्रकाराबद्दल कळले. अर्थात त्याचे कॉल थांबले नाहीत. त्याच्या मोबाईल कॉल्समुळे तोच नाही तर त्याच्यासोबत काम करणारेही वैतागले. इतके की, कंपनीने हे थांबले नाही तर तुला नोकरीवरून काढू अशी तंबी दिली.

 अखेर पुनीतने पोलिसांत तक्रार नोंदवली. दिल्लीच्या प्रीतमपुरा ठाण्यात सनी शिवाय ‘अर्जुन पटियाला’चा निर्माता व दिग्दर्शकाविरोधात त्याने तक्रार दाखल केली.  कुठल्याही व्यक्तीच्या परवानगी शिवाय त्याचा नंबर वापरता येत नाही. मी सगळीकडे हा एकच नंबर दिल्याने तो बदलवू शकत नाही, असे त्याने म्हटले आहे.

टॅग्स :सनी लिओनी