Join us

‘लाईफ इन ए मेट्रो’च्या सीक्वलमध्ये नसणार अर्जुन कपूर, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 17:55 IST

अनुराग बासूच्या ‘लाईफ इन ए मेट्रो’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल येणार, ही बातमी आम्ही काल-परवाच तुम्हाला दिली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि करिना कपूर ही ‘की अ‍ॅण्ड का’ची जोडी लीड रोलमध्ये असणार, असेही आम्ही तुम्हाला सांगितले होते.

अनुराग बासूच्या ‘लाईफ इन ए मेट्रो’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल येणार, ही बातमी आम्ही काल-परवाच तुम्हाला दिली होती. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि करिना कपूर ही ‘की अ‍ॅण्ड का’ची जोडी लीड रोलमध्ये असणार, असेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. पण आता एक ताजी बातमी आहे.त्यानुसार, अर्जुन कपूरने या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचे कळतेय. या बातमीने अर्जुनच्या तमात चाहत्यांची निराशा होणे, साहजिक आहे. पण त्याचाही नाईलाज आहे. अर्जुन कपूरच्या तारखांचा मेळ जुळत नसल्याने हा चित्रपट मनात नसताना त्याला नाकारावा लागल्याचे कळतेय. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या चित्रपटासाठी अर्जुन आधीच आपल्या डेट्स देऊन चुकला आहे. ‘लाईफ इन ए मेट्रो2’च्या मेकर्सलाही नेमक्या याच डेट्स हव्या होत्या. अर्जुनसाठी हे शक्य नव्हते़ अखेर त्याने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.अनुराग बासू यांचा ‘लाईफ इन ए मेट्रो’ २००७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, शाईनी आहुजा, केके मेनन, धर्मेन्द्र, नफीसा अली़ कंगना राणौत, इरफान खान, शर्मन जोशी, कोंकणा सेन शर्मा अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटात चार जोडप्यांची कथा दिसली होती. समीक्षक आणि प्रेक्षक दोन्हींनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली होती. चित्रपटाने अनेक अवार्डसही जिंकले होते. सुमारे दशकभरानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरू झाली आहे. या कथेसाठी अर्जुन कपूर हाच मेकर्सची पहिली पसंत होता. आता त्याने नकार दिल्यावर त्याच्याजागी कुणाची वर्णी लागते, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अर्जुन सध्या ‘नमस्ते इंग्लड’मध्ये बिझी आहे. नुकतेच त्याने ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचे शूटींग केले आहे. यानंतर तो ‘पानीपत’मध्ये दिसणार आहे. 

 

टॅग्स :अर्जुन कपूर