Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! मलायका, करिना, करिश्माने घेतली डुलकी;  अर्जुन कपूरने घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:10 IST

मित्रांची मजा घेण्यात अर्जुन अव्वल आहे. आता अर्जुनने कुणाची मजा घ्यावी तर चक्क गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा हिचीच.

ठळक मुद्देनेटक-यांनीही घेतली फिरकी

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर किती अ‍ॅक्टिव्ह असतो, हे तर आपण जाणतोच. बॉलिवूड स्टार्सला ट्रोल करण्यापासून तर इंटरनेट ट्रोलर्सला परखड उत्तरे देणा-यात अर्जुन कपूर नेहमी आघाडीवर असतो. अलीकडे तैमूर अली खानचा धर्म विचारणा-या एका ट्रोलरला अर्जुन कपूरने खरमरीत उत्तर देत, त्याची बोलती बंद केली होती. अर्थात ट्रोलर्सला लाथाडणे वेगळे आणि आपल्याच मित्रांची मजा घेणे वेगळे. मित्रांची मजा घेण्यातही अर्जुन अव्वल आहे. आता त्याने कुणाची मजा घ्यावी तर चक्क गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा हिचीच.

होय, मलायकाने करिना कपूर, करिश्मा कपूर, अमृता अरोरासोबतचा एक कोलाज शेअर केला. या कोलाजमध्ये सगळ्याजणी मस्तपैकी झोपा काढताना दिसताहेत. हा कोलाज शेअर करताना, ‘जे मित्र सोबत झोपतात, ते नेहमी सोबत राहतात,’ असे मलायकाने लिहिले. कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन असल्याच्या पार्श्वभूमीवर मलायकाने हा फोटो शेअर केला होता. पण अर्जुनने यावरून मलायकाची चांगलीच मजा घेतली.

‘तू तर झोपताना हसतेय, वाह क्या बात है,’ असे अर्जुनने या फोटोवर कमेंट करताना लिहिले. अर्जुन कपूरची ही कमेंट पाहून मलायका थोडीच शांत बसायची. तिनेही उत्तर दिले. ‘अर्जुन कपूर तुला माहितीये की मी झोपताना हसते,’ असे तिने यावर लिहिले.आता यात मलायका व अर्जुनचा इनसाईड जोक त्यांचा त्यांनाच ठाऊक. आपण केवळ इतकेच म्हणू शकतो की, लॉकडाऊनच्या काळातही मलायका व अर्जुन एकमेकांच्या संपर्कात आहेत.अर्जुन व मलायका दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांनीही हे नाते कधीच जगजाहीर केले आहे. सुरुवातीला दोघांनीही हे नाते लपवल. पण आताश: दोघेही बिनधास्त एकमेकांसोबत फिरताना दिसतात.

नेटक-यांनीही घेतली फिरकीमलायकाने हा फोटो शेअर करताच नेटक-यांनीही तिची फिरकी घेतली. इतके मेकअप करून कोण झोपते, असे एका युजरने लिहिले. किती खोटी खोटी डुलकी घेताय, असे एका युजरने कमेंट करताना म्हटले. अनेकांनी हे   म्हणजे ओव्हर अ‍ॅक्टिंग असल्याची प्रतिक्रिया दिली.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर