अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे नाते आता जगजाहिर आहे. अलीकडे अर्जुनने स्वत: या प्रेमाची जाहिर कबुली दिली. ‘प्रसारमाध्यमांनी आमच्या नात्याला कोणत्याही वाईट पद्धतीने न दाखवता संवेदनशीलता जपली, त्यामुळेच आम्ही दोघे प्रसारमाध्यमांसमोर खुलेपणाने समोर आलोत. आम्ही कधी प्रसारमाध्यमांपासून स्वत:चे नाते लपवले नाही आणि मीडियानेही प्रत्येक ठिकाणी त्यांचा पाठलाग केला नाही. प्रत्येक नात्याच्या स्वत:च्या अशा काही अडचणी असतात आणि मीडियाने आम्हाला यासाठीचा वेळ दिला, असे अर्जुन म्हणाला. एकंदर काय, तर मीडियाने, कुटुंबाने सगळ्यांनीच मलायका व अर्जुनचे नाते स्वीकारले. पण प्रत्येकजण हे नाते तितक्याच मोठेपणाने स्वीकारेल, असे नाही. अलीकडे एका युजरने मलायका व अर्जुन यांच्या नात्याची तुलना बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या नात्याशी केली. साहजिकच अर्जुनला हे आवडले नाही आणि त्याने या युजरची चांगलीच शाळा घेतली.
‘मी कुणाचाही तिरस्कार करत नाही, कुसूम. आम्ही आदरपूर्वक एकमेकांपासून अंतर ठेवून होतो. माझ्या मनात तिरस्काराची भावना असती तर मी माझे पिता आणि जान्हवी, खूशीसोबत खंबीरपणे उभा राहिलो नसतो. टाईप करणे आणि कुणाला जज करणे सोपे आहे. पण टाईप करण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा. तू वरूण धवनची चाहती आहेत. त्यामुळे मी तुझा सांगू इच्छितो की, वरूणचा फोटो स्वत:च्या डीपीवर लावून प्लीज तिरस्कार पसरवू नकोस,’असे अर्जुनने लिहिले. अर्जुनच्या या कमेंटनंतर कुसूमही ट्रोल झाली. अखेर तिने अर्जुनची माफी मागत, स्वत:चे ट्वीट डिलीट केले.
मी तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा कर. माझ्या मनात अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्याबद्दल कुठलीही वाईट भावना नाही, असे तिने लिहिले. कुसूमने माफी मागितल्यानंतर अर्जुनने पुन्हा तिला उत्तर दिले. इट्स ओके, कुसूम...प्रेम वाट...स्ट्रीट डान्सर (वरूण धवन) तुला बघतो आहे, असे त्याने लिहिले.