Join us

या चिमुकल्यांमधला एक बनला आहे बॉलिवूडचा अभिनेता, ओळखा पाहू कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 15:19 IST

अफेअरला घेऊन हा अभिनेता सतत सोशल मीडियावर ट्रोल होत असतो.

अर्जुन कपूर रोज कोणत्याना कोणत्या कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मलायकासोबतच्या अफेअरमुळे तो ट्रोल होत असतो. सोशल मीडियावर अर्जुन कपूर खूप अॅक्टिव्ह असतो. आपल्या आगामी प्रोजेक्ट संबंधीची माहिती तो आपल्या फॅन्सना देतो असतो.

नुकताच अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. यात अर्जुनसोबत त्याचे दोन भाऊ मोहित मारवाह आणि  अक्षय मारवाह दिसतायेत. अर्जुनने शेअर केलेल्या या फोटोत तिघेही खूप क्युट दिसतायेत. या फोटोतला लहानपणीचा अर्जुन कपूर लगेच ओळखता येतो आहे. अर्जुन कपूरचे त्याच्या चुलत भावडांसोबत तसेच बहिण अंशुला कपूरसोबत चांगलं बॉडिंग आहे. 

अर्जुन कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून तो मलायका सोबतच्या लग्नांच्या चर्चेमुळे चर्चेत आला आहे. अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी देखील अर्जुनने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, आम्ही मीडियासमोर येण्याचा विचार केला कारण आम्हाला वाटलं, मीडिया आमच्या नात्याचा आदर करत आहे.  

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, सध्या अर्जुन कपूर आगामी सिनेमा 'पानीपत'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अर्जुन कपूर यात मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूर