Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG! ‘कबीर सिंग’साठी शाहिद कपूर नाही तर हा अभिनेता होता निर्मात्यांची पहिली पसंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 12:32 IST

‘कबीर सिंग’ हा यंदाचा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला. शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर या चित्रपटाने 275 कोटींची बक्कळ कमाई केली.

ठळक मुद्देअर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘पानीपत’ या चित्रपटात बिझी आहे.

कबीर सिंग’ हा  यंदाचा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला. शाहिद कपूर व कियारा अडवाणी स्टारर या चित्रपटाने 275 कोटींची बक्कळ कमाई केली. रिलीजनंतर या चित्रपटावर टीकाही झाली. पण प्रेक्षकांनी मात्र हा चित्रपट डोक्यावर घेतला. केवळ इतकेच नाही तर शाहिद कपूरच्या करिअरच्या बुडत्या नौकेलाही या चित्रपटाने वाचवले. आता याच चित्रपटाबद्दल अभिनेता अर्जुन कपूरने एक मोठा खुलासा केला आहे. होय, ‘कबीर सिंग’चे निर्माते मला या चित्रपटात घेऊ इच्छित होते, असा खुलासा त्याने केला आहे.

एका ताज्या मुलाखतीत अर्जुन कपूर या चित्रपटावर बोलला.   निर्मात्यांनी या चित्रपटाचे हक्क विकत घेतले, अगदी तेव्हापासून लीड रोलसाठी त्यांच्या डोक्यात माझे नाव होते. पण ‘कबीर सिंग’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी मात्र या रोलसाठी शाहिद कपूरला आधीच वचन दिले होते. त्यामुळे माझ्याऐवजी ही भूमिका शाहिदला मिळाली, असे अर्जुनने या मुलाखतीत सांगितले. 

संदीप वांगा यांनी शाहिदला शब्द दिला होता. त्यामुळे मी हा चित्रपट नाकारण्याचा वा स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. मी दिग्दर्शकाच्या निर्णयाचा आदर केला. शाहिदनेही या भूमिकेला संपूर्ण न्याय दिला, असेही अर्जुन म्हणाला.अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या तो ‘पानीपत’ या चित्रपटात बिझी आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे. यात अर्जुनशिवाय संजय दत्त, क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत आहेत. ‘पानीपत’ शिवाय ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटातही अर्जुन दिसणार आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरशाहिद कपूरकबीर सिंग