Join us
Daily Top 2Weekly Top 5

आजीला नातवंड बघायची आहेत, तिची ही इच्छा पूर्ण करु शकत नसल्याने अर्जुन कपूर दुःखी म्हणाला.......

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 11:58 IST

जीवनात प्रत्येकाची कोणतीतरी एक इच्छा असते, ती कधीचं पूर्ण होत नाही. अशीचं एक इच्छा आहे होती अर्जुन कपूरच्या आजीची.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या सिनेमांपेक्षा खाजगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. मलायका अरोरासहअर्जुन कपूर त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत असतात. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने मलायकाने  स्पष्ट करत दोघंही लग्न करणार नसल्याचे समोर आले होते.अर्जुन नेहमीच मलायकासोबतच्या रिलेशनबाबत वेळोवेळी बोलताना दिसतो.आता पुन्हा तो अशाच कारणामुळे चर्चेत आहे. 

अर्जुनच्या ‘सरदार का ग्रँडसन’ या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. सिनेमात अर्जुन सोबत मुख्य भूमिकेत रकुन प्रीत सिंह, जॉन अब्राहम, नीना गुप्ता आणि आदिती राव हैदरी मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा १८ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा खाजगी आयुष्यावर बोलताना दिसला.

 

त्याच्या आयुष्याविषयी पहिल्यांदाच त्याने अनेक खुलासे केले आहेत.  जीवनात प्रत्येकाची कोणतीतरी एक इच्छा असते, ती कधीचं पूर्ण होत नाही. अशीचं एक इच्छा आहे होती अर्जुनच्या आजीची.यावेळी अर्जुन त्याच्या आजीच्या इच्छेबद्दल मन मोकळे करताना  दिसला होता. 

 

आजीची इच्छा तो पूर्ण करु शकत नसल्याचे दुःख त्याने या वेळी मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. माझ्या आजीला माझ्या मुलांना पाहायचे होते. तिलाही नातवंड हवी आहेत. आजीची इच्छाही मी पूर्ण करु शकत नसल्याचे दुःख सदैव मनात राहणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

मलायकाने सुपर डान्सर ४ कार्यक्रमात तिची इच्छा सांगितली होती.  अवघ्या 6 वर्षाच्या फ्लोरिना गोगोईने तिच्या नृत्य कौशल्याने मलायकाला घायाळ केलं.  नृत्य सादरीकरणानंतर मलायकाने फ्लोरिनाला जवळ घेतलं आणि तिचं मनभरून कौतुक केलं. यावेळी फ्लोरिनाला पाहून मलायकाने सांगितले की, मला कायम एक मुलगी हवी होती.

 

फार पुर्वी मी म्हणायची मला एक मुलगी असती तर? माझ्याकडे सुंदर कपडे  आणि चपला देखील आहेत. पण त्या घालायला कोणी नाही.' त्यानंतर मलायकाने फ्लोरिनाला घट्ट मिठी मारली. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा