Join us

मलायकासोबतच्या लग्नाबाबत बोलला अर्जुन कपूर, लग्न करेन तेव्हा नक्की सांगेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 11:55 IST

सध्या अर्जुन कपूर लग्नाच्या चर्चांना घेऊन चर्चेत आहे. लवकरच अर्जुन कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत लग्नाच्या बेडीत अडकू शकतो. 

ठळक मुद्देअर्जुन ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेया सिनेमाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता करतायेत

सध्या अर्जुन कपूर लग्नाच्या चर्चांना घेऊन चर्चेत आहे. लवकरच अर्जुन कथित गर्लफ्रेंड मलायका अरोरासोबत लग्नाच्या बेडीत अडकू शकतो.  

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अर्जुन लग्न करत नसल्याचे त्यांने स्पष्ट केले आहे. जेव्हा मी लग्न करणार असेन त्यावेळी मी याबाबत स्पष्ट शब्दात सांगेन मला लपवण्याची गरज वाटत नाही. सध्या अर्जुन ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता करतायेत.  फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणची निर्मिती असलेल्या या सिनेमात अर्जुनशिवाय अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.  हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येतेय. 

याशिवाय अर्जुन आशुतोष गोवारीकरच्या ‘पानीपत’ मध्ये दिसणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहे.‘पानीपत’मध्येअर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे.

संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिका जिवंत करणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर व संजय दत्त तलवारबाजी करताना दिसणार आहेत. तसेच  अर्जुनचा परिणीती चोप्रा संदीप और पिंकी फरारमध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा