अर्जुन कपूर म्हणाला, मला अजूनही सोनाक्षी आवडते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 14:59 IST
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. मध्यंतरी या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा ...
अर्जुन कपूर म्हणाला, मला अजूनही सोनाक्षी आवडते!
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील. मध्यंतरी या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा बरीच रंगली होती. यानंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली. पण म्हणतात ना, काही नाती कायम राहतात. केवळ आमचेच नाही तर अर्जुनचेही हेच मत आहे. एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हासोबतच्या रिलेशनशिपवर विचारल्यावर अर्जुन हेच बोलला.चर्चा खरी मानाल तर अर्जुन आणि सोनाक्षी दोघेही दिर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यादरम्यान हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. अर्थात आता दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत. ‘तेवर’ या चित्रपटात अर्जुन व सोनाक्षीने एकत्र काम केले होते. तेथूनच दोघांमध्ये पे्रम फुलल्याचे मानले जाते. ब्रेकअपनंतर अनेकदा दोघांचा आमना-सामना झाला. पण प्रत्येकवेळी सोनाक्षी व अर्जुन मागचे सगळे काही विसरून अगदी सामान्यपणे परस्परांना भेटताना दिसले.अलीकडे एका मुलाखतीत, अर्जुन सोनाक्षीबद्दल बोलला. मला अजूनही सोनाक्षी आवडते, हे त्याने प्रामाणिकपणे कबुल केले. एक चांगली व्यक्ति म्हणून मला ती आवडते. आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा आधीसारखेच वागतो, असे तो म्हणाला. काही नाती कायम राहतात. काही नाही, असेही तो म्हणाला. या मुलाखतीदरम्यान अर्जुनने सोनाक्षीच्या ‘नूर’ या आगामी चित्रपटाचीही बरीच प्रशंसा केली. सोनाक्षीच्या करिअरचा हा सगळ्यात चांगला काळ आहे, असे तो म्हणाला.सोनाक्षीचा ‘नूर’ हा सिनेमा लवकरच रिलीज होतो आहे. याऊलट अर्जुनचाही ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. अशात अर्जुनच्या शुभेच्छा सोनाक्षीच्या किती कामी येतात, ते आपण बघूच.