Join us
Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरासोबत लग्न करण्यासाठी घरातल्यांचा दबाव, अर्जुन कपूरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 16:53 IST

लग्नासाठी घरातल्यांचा दबाव असल्याचा खुलासा केला अर्जुन कपूरने

अर्जुन कपूरमलायका अरोरा यांनी बराच काळ त्यांचे नाते जगापासून लपवून ठेवले होते. मात्र मागील वर्षी एकमेकांच्या वाढदिवसादिवशी या जोडीने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल बोलायला सुरूवात केली. अर्जुन कपूरची चुलत भावंडं सोनम कपूर व मोहित मारवाह यांचेदेखील लग्न झाली आहेत आणि आता तीन बहिणींचा मोठा भाऊ अर्जुन कपूरवर देखील लग्न करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. याचा खुलासा खुद्द त्यानेच केला आहे.  

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनला विचारलं की, तुझी पंजाबी फॅमिली तुझ्या लग्नासाठी दबाव टाकत आहेत का? यावर अर्जुन म्हणाला की, नाही, खरेतर माझ्या कुटुंबातील लोक समजून गेलेत की मी सगळ्यांचे ऐकतो पण मी करतो माझ्या मनाचंच. ते माझ्यावर दबाव टाकायचे पण एका मर्यादेनंतर त्यांनी बोलायचं बंद केलं. त्यांना माझ्यावर विश्वास आहे की मी जो काही निर्णय घेईन तो प्रॅक्टिकल पैलू समजून घेईन. मी माझ्या वयापेक्षा जास्तच प्रगल्भ आहे. माझ्या जीवनातील बऱ्याच समस्या त्यांना न सांगताच सांभाळून घेतो. 

तो पुढे म्हणाला की, याबाबत जेव्हा मी कोणता निर्णय घेईन तेव्हा त्यांना डोक्यात ठेवूनच करेन. लवकर की उशीरा हा निर्णय माझ्या मनाचाच असेल. मी नेहमीच सांगत आलो आहे की मी लग्नाचा निर्णय घेईन तेव्हा त्याला लपवणार नाही.

अर्जुन नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मलायकाच्या कुटुंबासोबत गोव्याला गेला होता. मलायकाने नवीन वर्षात अर्जुनसोबतचा एक रोमँटिक फोटोदेखील शेअर केला होता.

अर्जुन लवकरच अभिनेत्री रकुल प्रीतसोबत एका चित्रपटात झळकणार आहे. सध्या तो या चित्रपटाची तयारी करण्यात बिझी आहे.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा