रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची मैत्री इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांच्या ब्रोमान्सच्या चर्चा सगळीकडे असतात. ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीर व अर्जुन एकत्र दिसले आणि तेव्हापासून एकमेकांचे घट्ट मित्र झालेत. पण तेव्हापासून ही जोडी कुठेही दिसली नाही. ना चित्रपटात, ना कुठल्या इव्हेंटमध्ये. आता अशात चाहत्यांना या जोडीची आठवण येणे साहजिकच आहे. या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यास उत्सूक असलेल्या एका चाहत्याने मग थेट रणवीरलाचं याबद्दल विचारून टाकले. तुम्हा दोघांची जोडी पुन्हा कधी एकत्र येतेय,असा प्रश्न एका चाहत्याने केला. या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘होय, मलाही त्याची खूप आठवण येते. बाबाला माझ्यासाठी वेळ नाही. तो ‘पानीपत’मध्ये बिझी आहे,’ असे रणवीरने लिहिले.
रणवीर सिंगला आली अर्जुन कपूरची आठवण! वाचा मजेशीर ट्विट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 15:51 IST
रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची मैत्री इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांच्या ब्रोमान्सच्या चर्चा सगळीकडे असतात. ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीर व अर्जुन एकत्र दिसले आणि तेव्हापासून एकमेकांचे घट्ट मित्र झालेत. पण तेव्हापासून ही जोडी कुठेही दिसली नाही.
रणवीर सिंगला आली अर्जुन कपूरची आठवण! वाचा मजेशीर ट्विट!!
ठळक मुद्देतूर्तास रणवीर सिंग आपल्या ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.हा चित्रपट येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत झळकणार आहे.