Join us

अर्जुन कपूर आहे मलायकाचा 'ढ' शिष्य, इन्स्टावर धडे देऊनही शिकला नाही 'या' गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 16:55 IST

बी-टाऊनमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत

ठळक मुद्देसोशल मीडियावर अर्जुन आणि मलायका दोघेही अॅक्टिव्ह असतात.

बी-टाऊनमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशीपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते दोघे एकमेकांना बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत. अर्जुन आणि मलायका अरोरा यांच्या अफेयर व लग्नाची चर्चा वारंवार होताना ऐकायला मिळते.

सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायका दोघेही अॅक्टिव्ह असतात. अर्जुनच्या फोटोवर मलायका तर मलायकाच्या फोटोंवर अर्जुन अनेक वेळा कमेंट्स करताना दिसतो. मलायकाने इन्स्टाग्रामवर पाच फोटोंची सिरीज करुन. त्यात तिने आपल्या फॅन्ससोबत केस बांधण्याच्या टीप्स दिल्या आहेत. या फोटोला तिने 'केस बांधण्याची कला पाच स्टेप्समध्ये जाणून घ्या' असे कॅप्शनदेखील दिले आहे. मलायकाच्या या फोटोवर अर्जुन कमेंट केली आहे. 'अर्जुनने लिहिले, हे पाच फोटोंनंतरही केस नाही बांधू शकलो.' अर्जुन कपूरसोबत मलायकाच्या इतर फॅन्सनीदेखील या फोटोवर कमेंट्स दिल्या आहेत. काहींनी तिला ट्रोलदेखील केले आहे. 

अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी देखील अर्जुनने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, आम्ही मीडियासमोर येण्याचा विचार केला कारण आम्हाला वाटलं, मीडिया आमच्या नात्याचा आदर करत आहे. ते आमच्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे वागत असल्यानेच आम्ही मीडियासमोर एकत्र येण्याचे ठरवले.     

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर