Join us

अर्जुन कपूर या कारणामुळे घालायचा सतत कॅप, कॅप काढल्यानंतर मलायकाने दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 16:27 IST

अर्जुन कपूरने जवळजवळ नऊ महिन्यांनंतर त्याची कॅप काढली असून तो स्वतः या गोष्टीमुळे प्रचंड खूश आहे. त्यानेच इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे.

ठळक मुद्देआता ही कॅप काढण्याची वेळ आली आहे. १६ नोव्हेंबर ते आजपर्यंत मी माझा पानिपत मधील लूक लपवण्यात यशस्वी झालो... याचे सगळे श्रेय माझ्या सगळ्या कॅप्सना जाते. या पोस्टवर मलायकाने फायनली... अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुन कपूर गेल्या कित्येक दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आपल्याला कॅपमध्येच दिसून येत आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून सतत कॅप का घालत आहे यामागे एक खास कारण असून हे कारण काय आहे हे नुकतेच अर्जुननेच त्याच्या सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. 

अर्जुन कपूरने जवळजवळ नऊ महिन्यांनंतर त्याची कॅप काढली असून तो स्वतः या गोष्टीमुळे प्रचंड खूश आहे. त्यानेच इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. गेल्या नोव्हेंबरपासून अर्जुन सतत कॅप घालत असून त्याने इन्स्टाग्रामला शेअर केलेल्या व्हिडिओंमधून याविषयी कारण सांगितले आहे. त्याच्या पानिपत या चित्रपटातील त्याचा लूक हा खूप वेगळा असणार आहे. हाच लूक लपवण्यासाठी अर्जुन कॅप घालत होता. अर्जुनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो त्याच्या डोक्यावरील कॅप काढताना दिसत आहे. त्याने या पोस्टसोबत लिहिले आहे की, आता ही कॅप काढण्याची वेळ आली आहे. १६ नोव्हेंबर ते आजपर्यंत मी माझा पानिपत मधील लूक लपवण्यात यशस्वी झालो... याचे सगळे श्रेय माझ्या सगळ्या कॅप्सना जाते. या पोस्टवर मलायकाने फायनली... अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अर्जुनने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर कॅप काढल्यानंतरचा त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत इतनी खुशी असे त्याने लिहिले आहे.

तसेच आणखी एका व्हिडिओत त्याचा हा लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. या पोस्टवर मलायकाने केवळ Hmm अशी कमेंट दिली आहे.

अर्जुन आणि मलायका नात्यात असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. ते दोघे अनेकवेळा एकत्र दिसत असून ते मीडियासमोर फोटोसाठी एकत्र पोझ देखील देत असत. पण त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. मात्र अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर ते दोघे न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तिथले फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले. हे फोटो खूप व्हायरल झाले होते. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा