Join us
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे अर्जुन कपूरचा ‘पानीपत’मधील नवा लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 14:51 IST

होय, सध्या अर्जुन त्याचा आगामी चित्रपट ‘पानीपत’च्या तयारीत बिझी आहे. या पीरियड ड्रामामध्ये अर्जुन एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्दे‘पानीपत’ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सोबतचं त्याचे नवे लूकही चर्चेचा विषय ठरत आहेत. होय, सध्या अर्जुन त्याचा आगामी चित्रपट ‘पानीपत’च्या तयारीत बिझी आहे. या पीरियड ड्रामामध्ये अर्जुन एका आगळ्यावेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांत अर्जुनने हे लूक मीडियापासून लपवून ठेवले होते. यासाठी तो सर्रास चेहऱ्यावर मास्क लावून फिरत होता. पण आज अर्जुनचे हे नवे लूक सगळ्यांसमोर आले. बुधवारीअर्जुन मलायकासोबत अमृता अरोराच्या घरी पार्टीसाठी पोहोचला. या पार्टीत करिना कपूरही दिसली. यावेळी अर्जुन नव्या लूकमध्ये दिसला. त्याचे हे नव्या अवतारातील फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.

अर्जुनचे हे लूक पाहून इतक्या दिवस त्याने ते का लपवून ठेवले, याचा अंदाज तुम्हाला आला असेलच. फोटोत अर्जुनच्या पिळदार मिशा दिसत आहेत.

एका फोटोत तर तो मिशांवर ताव देताना दिसतोय. लूक पाहता, अर्जुनसाठी ‘पानीपत’ हा चित्रपट टर्निंग प्वॉर्इंग ठरणार, असे मानले जात आहे.

‘पानीपत’ची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तूर्तास अर्जुन कपूर त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या मलायका अरोराच्या प्रेमात वेडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बिनधास्त फिरताना दिसत आहेत. कालपरवा महीप कपूरने मलायका व अर्जुनचा एका पार्टीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत मलायका अर्जुनला अगदी बिलगुन बसलेली दिसली होती.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा