Join us

अर्जुन कपूर-मलायका अरोरा जूनमध्ये लग्न करणार? जाणून घ्या संपूर्ण सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:03 IST

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बॉलिवूडमधील हॉट कपल बनले आहे.

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बॉलिवूडमधील हॉट कपल बनले आहे. अनेक महिन्यांपासून दोघे एकमेकांना डेट करतायते. सोशल मीडियावर दोघांनी आपलं नातं अधिकृत केले आहे. दोघांच्या लग्नाबाबत त्यांचे फॅन्स खूप एक्सायडेट आहेत त्यांनी लग्नाची तारीख दिली निश्चित केली आहे. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या आपआपल्या घरात वेळ घालवत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघे एप्रिलमध्ये लग्न करणार अशा चर्चा झाली होती मात्र ती गोष्ट अफवा ठरली. मीडिया रिपोर्टनुसार यानंतर लोक येथेच थांबले नाहीत, आता असेही वृत्त येत आहे की हे दोघे जूनमध्ये लग्न करू शकतात.  हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार अर्जुन कपूर यांनी गेल्या महिन्यात एका मुलाखतीत आपला प्रतिक्रिया दिली होती. 

अर्जुन कपूर लग्नाच्या अफवांवर म्हणाला, मी लग्न करत नाहीय. मी 33 वर्षांचा आहे, मला लग्न करण्याची कोणतीच घाई नाही आहे. लग्न हा असा निर्णय आहे, ज्याबद्दल मी माझ्या कुटुंबाचा आधी सल्ला घेईन. माझ्या लग्नाबद्दल काही असेल तर तुम्हाला चे नक्कीच कळेल.अशा अफवांमुळे कोणतेही नुकसान होत नाही, परंतु मला पुन्हा त्याच गोष्टीचे उत्तर देणे आवडत नाही. माझी कोणतीही तक्रार नाही, परंतु अफवा पसरवण्याऱ्या लोकांना प्रत्येक वेळी प्रतिसाद देणे खूप त्रासदायक बनते.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा