Join us

अर्जुन कपूरने नवीन वर्षात बनवला हटके टॅटू, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 18:34 IST

Arjun Kapoor : अभिनेता अर्जुन कपूर सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे.

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो त्याच्या नव्या टॅटूमुळे चर्चेत आला आहे. त्याने सोशल मीडियावर टॅटू बनवतानाचा व्हिडीओ शेअर करत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. दरम्यान आता त्याच्या टॅटूवर अभिषेक बच्चनने रिअ‍ॅक्शन दिली आहे.

अर्जुन कपूरने टॅटूचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आपण जे होतो त्याच राखेतून आपण ते बनू शकतो, जे आपल्याला बनायचं आहे. अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओत अभिनेता टॅटू हातावर कोरत असताना दिसत आहे. टॅटूत राइज असे लिहिले आहे. हा टॅटू फिनिक्सने प्रेरणा घेऊन बनवला आहे. यासोबतच तो टॅटू आर्टिस्टसोबत बोलताना दिसत आहे.

अर्जुन कपूरचा हा टॅटू व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याचा टॅटू खूप आवडला आहे. चाहत्यांसोबतच स्टार्सनाही त्याच्या टॅटूला पसंती मिळताना दिसत आहे. अर्जुनच्या व्हिडिओ पोस्टवर अभिनेता अभिषेक बच्चनने हात वर करत इमोजीसह आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वर्कफ्रंट...

अर्जुन कपूरच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचे तर अर्जुन शेवटचा दिग्दर्शक आस्मान भारद्वाजच्या डार्क कॉमेडी चित्रपट कुत्तेमध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू, राधिका मदन आणि कोंकणा सेन शर्माही मुख्य भूमिकेत दिसले होते. आता येत्या काही दिवसांत अर्जुन अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंगसोबत एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही.

टॅग्स :अर्जुन कपूर