Join us

हे दु:खद व लज्जास्पद...! मलायकाच्या कमाईशी तुलना, भडकला अर्जुन कपूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 16:52 IST

आता सेलिब्रिटी म्हटल्यावर चर्चा तर होणार, हेडलाईन्सही बनणार. पण तूर्तास काय तर एका हेडलाईन्समुळे अर्जुन जाम संतापला आहे....

ठळक मुद्देअर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) चित्रपटांपेक्षा कमी अन् मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतो. या ना त्या कारणानं हे जोडपं सतत चर्चेत असतं. आता सेलिब्रिटी म्हटल्यावर चर्चा तर होणार, हेडलाईन्सही बनणार. पण तूर्तास काय तर एका हेडलाईन्समुळे अर्जुन जाम संतापला आहे. होय, इन्स्टास्टोरीवर त्यानं याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीत अर्जुन व मलायकाच्या (Malaika Arora) कमाईची तुलना केली गेली होती. ही तुलनाच अर्जुनला खटकली. इन्स्टास्टोरीवर त्यानं याबद्दल नाराजी बोलून दाखवली. ‘2021 मध्ये अशा हेडलाईन्स बनतात, ही दुर्दैवी व लाजीरवाणी बाब आहे. बिल्कुल, ती चांगली कमावते आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिनं अनेक वर्ष मेहनत घेतलीयं. पण याची तुलना कोणाशीही होता कामा नये, अगदी माझ्याशी सुद्धा...,’ अशा शब्दांत अर्जुननं त्याची नाराजी व्यक्त केली.

अलीकडे एका मुलाखतीत अर्जुननं मलायकांचं कौतुक केलं होतं. मलायका एक स्वतंत्र बाण्याची महिला आहे. 20 व्या वर्षांपासून आत्तापर्यंत ती काम करतेय. यामागे तिचे अथक परिश्रम आहेत. मलायकाला मी कधीच तक्रार करताना पाहिले नाही. आजुबाजूला कितीही प्रतिकूल गोष्टी घडोत, ती कधीच तक्रार करत नाही. ती कामाबद्दल बाता मारण्याऐवजी काम संपवण्याकडे तिचा कल असतो. तिच्या विचारात मी कधीच नकारात्मकता बघितली नाही. आयुष्यात आनंदी कसे राहायचे याचाच ती सतत प्रयत्न करत असते. मी रोज तिच्याकडून नवे काही तरी  शिकतो, असे अर्जुन म्हणाला होता.अर्जुन व मलायकाच्या वयात बरेच अंतर आहे. पण जगाची पर्वा न करता दोघेही प्रेमात पडले आणि कालांतराने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली. हे कपल लवकरच लग्न करणार, अशी चर्चा आहे. 

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा