Join us

​बहीण जान्हवी कपूरच्या ड्रेसवरील बातमीने पुन्हा भडकला अर्जुन कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:20 IST

अर्जुन कपूर आपल्या कुटुंबाप्रति किती प्रोटेक्टिव्ह आहे, हे पुन्हा एकदा दिसले. जान्हवी कपूरबद्दल लिहिणा-या एका आॅनलाईन पोर्टलला अर्जुनने ज्या ...

अर्जुन कपूर आपल्या कुटुंबाप्रति किती प्रोटेक्टिव्ह आहे, हे पुन्हा एकदा दिसले. जान्हवी कपूरबद्दल लिहिणा-या एका आॅनलाईन पोर्टलला अर्जुनने ज्या पद्धतीने सुनावले, त्यावरून तरी हेच दिसले. संबंधित आॅनलाईन पोर्टलने जान्हवी तिच्या ड्रेसमुळे ट्रोल झाल्याची बातमी दिली होती. या न्यूजची हेडलाईन वाचली अन् अर्जुन कपूर लालबुंद झाला. केवळ इतकेच नाही तर मीडिया ट्रोलिंगला चालना वा प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही त्याने केला.अलीकडे जान्हवी तिचा मित्र व सहअभिनेता ईशान खट्टरसोबत मुंबईच्या एका कॅफेत स्पॉट झाली होती. यावेळी जान्हवीने शॉर्ट वन पीस घातला होता. यानंतर एका आॅनलाईन पोर्टलने ‘जान्हवी कदाचित काही घालणे विसरली,’ अशा आशयाची हेडलाईन बनवली.  नेमक्या याच बातमीवरून अर्जुनचा पारा चढला.‘ट्रोलर्सने फोटोबद्दल लिहिले आणि तुम्ही त्याची एक मोठी बातमी बनवली़ मीडिया ट्रोलर्सला कशापद्धतीने चालना देतोय, हे अतिशय लज्जास्पद आहे,’ असे अर्जुनने लिहिले.ALSO READ : जान्हवी कपूरसोबत झाले असे काही की भडकला अर्जुन कपूर !!अशापद्धतीने भडकण्याची अर्जुनची ही पहिली वेळ नाही. याआधीही जान्हवीबद्दल अशाच पद्धतीची बातमी छापल्याबद्दल तो मीडियावर भडकला होता. त्याहीवेळी जान्हवी ड्रेसवरूनचं ट्रोल झाली होती. ‘तुमची नजर अशा गोष्टी शोधत असेल तर तुम्हाला लाज वाटायला हवी. देशात मुलींकडे कशा नजरेतून पाहिले जाते, याचे हे उदाहरण आहे,’ असे ट्विट त्याने केले होते.श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हे दोघेही जान्हवी व खुशी या सावत्र बहिणींना फुलासारखे जपतांना दिसताहेत. एकेकाळी अर्जुन व अंशुला जान्हवी व खुशीचे नावही ऐकणे पसंत करायचे नाहीत. पण श्रीदेवींच्या निधनानंतर दोघेही जान्हवी व खुशीच्या कधी नव्हे इतक्या जवळ आले आहेत. आपल्या सावत्र बहिणींना आणि वडिलांना आपली गरज आहे, याची जाणीव अर्जुनला झाली आहे आणि अशास्थितीत अर्जुन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे.