Join us
Daily Top 2Weekly Top 5

का लांबतेय मलायका-अर्जुनचे लग्न? हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 08:00 IST

गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. पण प्रत्यक्षात हे कपल केव्हा लग्न करणार? याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.

ठळक मुद्देमलायका सुद्धा अलीकडे एका मुलाखतीत लग्नाच्या प्लानबद्दल बोलली होती.

मलायका अरोराअर्जुन कपूर याची लव्ह स्टोरी आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. एकेकाळी चोरून लपून भेटणारे हे कपल आता खुल्लमखुल्ला फिरताना दिसतेय. रोमॅन्टिक फोटो शेअर करून एकमेकांवरच्या प्रेमाची जाहीर कबुली देतेय. नव्या वर्षाच्या मुहूतार्ला मलायका व अर्जुनने एकमेकांना  किस करतानाचे फोटो शेअर केलेत आणि या नात्यावर नव्याने शिक्कामोर्तब झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या कपलच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. पण प्रत्यक्षात हे कपल केव्हा लग्न करणार? याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आता मलायका व अर्जुनच्या लग्नाबद्दल एक ताजी माहिती आहे. होय, दोघांचे लग्न का लांबतेय, याचे उत्तर या माहितीत आहे.

चर्चा खरी मानाल तर मलायका अर्जुनसोबत लग्न करण्यासाठी एकदम तयार आहे. पण अर्जुन कपूरमुळे हे लग्न लांबतय. होय, अर्जुन अद्यापही लग्नासाठी तयार नसल्याचे कळतेय. खरे तर अर्जुनचे लवकरात लवकर दोनाचे चार हात व्हावेत, ही त्याच्या कुटुंबाची इच्छा आहे. यासाठी अर्जुनवर घरचे दबाब टाकत आहेत. पण अर्जुनला इतक्यात लग्न करायखे नाही. योग्य वेळ येईल तेव्हाच लग्न करेल, असे त्याने घरच्यांनाही ठणकावून सांगितले आहे.

मध्यंतरी एका मुलाखतीत अर्जुन लग्नावर बोलला होता. ‘मी वयापेक्षा जास्तच प्रगल्भ आहे. पण लग्नासारखा इतका मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा लागतो. असा निर्णय घेताना ना घाई चांगली, ना विलंब चांगला. अगदी योग्य वेळी हा निर्णय घ्यायला हवा,’ असे तो म्हणाला होता.

मलायका सुद्धा अलीकडे एका मुलाखतीत लग्नाच्या प्लानबद्दल बोलली होती. ‘सध्या माझ्याकडे अनेक प्लान तयार आहेत. मी माज्या टीमसोबत माझा बिझनेस वाढवण्यावर भर देतेय. मला काही मोठे करायचे आहे. 2019 हे वर्ष माज्यासाठी चांगले राहिले. या वर्षाने मला बिझनेस वुमन ही ओळख दिली. नव्या वर्षांत मला हे स्थान आणखी भक्कम करायचे आहे. लग्नाचे म्हणाल तर सध्या याबद्दल बोलणे घाईचे ठरेल. कारण एकावेळी एकच काम हे माझे तत्त्व आहे. आम्ही काय करतोय, हे आम्हाला दोघांनाही चांगले ठाऊक आहे. काही गोष्टी मार्गी लागल्यावर आम्ही लग्नाचे ठरवू,’ असे ती म्हणाली होती.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा