मलायका अरोरा व अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करताहेत. अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्त दोघांनीही सुट्टीचा प्लान बनवला आणि दोघेही न्यूयॉर्कला रवाना झाले. खरे तर याआधीही मलायका व अर्जुन हॉलीडेवर गेले आहेत. पण यंदाचा प्लान खास होता. हा प्लान सीक्रेट नव्हता तर खुल्लमखुल्ला प्रेमाची कबुली देणारा होता. होय, मलायकाने यादरम्यान अर्जुनवरील आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली. पाठोपाठ अर्जुननेही जाहिरपणे आपले प्रेम व्यक्त केले.
माझी पर्सनल व प्रोफेशनल लाईफ चांगली सुरु आहे. आयुष्यात मी स्थिरावलो, असे मला वाटतेय. मी माझे खासगी आयुष्य कधीच लपवले नाही. त्यामुळे लग्नाचा बेत असेल तर तेही मी जगापासून लपवणार नाही, असे अर्जुन अलीकडे एका मुलाखतीत म्हणाला होता. एकंदर काय तर ‘दोनों तरफ लगी है आग बराबर...,’ असेच अर्जुन व मलायकाबद्दल म्हणता येईल.