Join us

Happy Birthday Arjun : अर्जुन कपूरच्या घरी नाही फॅन, मजेशीर आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 10:35 IST

आज अर्जुन कपूरचा वाढदिवस.  वाढदिवसानिमित्त अर्जुनच्या आयुष्याशी निगडीत काही रोचक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ठळक मुद्देएकेकाळी अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता. याचे कारण होते, त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट.

काही कमी वेळात अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला. अर्जुन कपूरचे चित्रपट भलेही बॉक्स आॅफिसवर फार चालत नसतील  पण तरूणाईत त्याची मोठी क्रेझ आहे. त्याचा अभिनय आणि हिरोईनसोबतची त्याची केमिस्ट्री पाहायला प्रेक्षकांना आवडते. आज अर्जुनचा वाढदिवस.  वाढदिवसानिमित्त अर्जुनच्या आयुष्याशी निगडीत काही रोचक माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये येण्याआधी चांगलाच लठ्ठ होता, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्याचे घरचे नाव फुबु होते. त्याचे काही मित्र आजही त्याला याच नावाने बोलवतात.

फुबु या निकनेममागेही एक रोचक कहाणी आहे. होय, फुबु हे कपड्यांच्या अमेरिकन ब्रँडचे नाव आहे. हे ब्रँड मोठ्या साईजचे कपडे बनवले. अर्जुनला नॉर्मल कपडे कधीच फिट येत नसत. फुबु ब्रँड फुटबॉलची जर्सी बनवायचा. अर्जुन नेहमी तशाच जर्सी घालायचा. त्याला स्पोर्टची आवड होती. पण लठ्ठपणामुळे तो खेळू शकत नव्हता. त्यामुळेच सगळे त्याला फुबु म्हणू लागले. आजही जवळचे मित्र त्याला याच नावाने ओळखतात.

एकेकाळी अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता. याचे कारण होते, त्याच्या आईवडिलांचा घटस्फोट. अर्जुनचे पापा बोनी कपूर यांनी  मोना कपूर यांना घटस्फोट देत स्वत:पेक्षा 7 वर्षांनी लहान श्रीदेवीशी लग्न केले. याकाळात अर्जुन, त्याची आई आणि बहीण या तिघांना प्रचंड संघर्ष करावा लागला. याचकाळात एकवेळ अशीही आली की, अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला होता.

अर्जुनला एका गोष्टीचा फोबिया आहे. होय, सीलिंग फॅनची अर्जुनला प्रचंड भीती वाटते. त्यामुळे त्याच्या घरी कुठेही सीलिंग फॅन नाही.

टॅग्स :अर्जुन कपूर