अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा आता झळकणार या चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 12:53 IST
इश्कजादे या चित्रपटाद्वारे अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना फारच आवडला होता. या चित्रपटात त्याची ...
अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा आता झळकणार या चित्रपटात
इश्कजादे या चित्रपटाद्वारे अर्जुन कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना फारच आवडला होता. या चित्रपटात त्याची आणि परिणिता चोप्राची केमिस्ट्री खूपच छान जुळून आली होती. या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनची आजदेखील चर्चा केली जाते. पण या दोघांनीही इश्कजादे या चित्रपटानंतर पुन्हा कधीच एकमेकांसोबत काम केले नाही. इश्कजादेनंतर दोघेही त्यांच्या करियरमध्ये आता चांगलेच सेटल झाले आहेत. अर्जुन आणि परीने एकत्र काम करावे अशी गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे. त्यांच्या फॅन्सची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. आता ते दोघे यश राज प्रोडक्शनच्या एका चित्रपटात एकत्र झळकणार असल्याची चर्चा आहे. खोसला का घोसला, लव्ह सेक्स और धोका, ओए लकी, लकी ओए यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले दिबाकर बॅनर्जी लवकरच एक चित्रपट दिग्दर्शित करणार असून या चित्रपटात अर्जुन प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर असून या चित्रपटात अर्जुन हरियाणी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी परिणिती चोप्राचा विचार केला जात आहे असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 2017च्या मध्यापर्य़ंत सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी लवकरच या चित्रपटाबद्दल घोषणा केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.परिणितीने हा चित्रपट स्वीकारल्यास प्रेक्षकांना पुन्हा एकदा अर्जुन आणि परिणितीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. परिणिती हा चित्रपट करण्यास उत्सुक असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.