अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या नमस्ते इंग्लंडची रिलीज डेट बदलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 10:56 IST
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा सध्या आपला आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट अक्षय कुमार आणि ...
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राच्या नमस्ते इंग्लंडची रिलीज डेट बदलली
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा सध्या आपला आगामी चित्रपट 'नमस्ते इंग्लंड'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफचा 2007मध्ये आलेल्या 'नमस्ते लंडन'चा सीक्वल आहे. 'नमस्ते इंग्लंड’ आधी 2018 च्या डिसेंबर महिन्यात रिलीज होणार होता मात्र आता तो यावर्षीच्या दसऱ्याला रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये अचानक का बदल करण्यात आला आहे मात्र यामागील काही कारण अजून समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार नमस्ते इंग्लंडची शूटिंग खूप फास्ट करण्यात येते आहे. ज्यामुळे निर्मात्यांनी चित्रपट डिसेंबरऐवजी अक्टोबरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.मीडियाच्या रिपोर्टनुसार दिग्दर्शक विपुल शाहने पंजाबमधील वेग-वेगळ्या लोकेशनवर शूट करण्यात येतेय. जो आजपर्यंत बॉलिवूडमध्ये दाखवण्यात आलेले नाहीत. रिपोर्टनुसार नमस्ते इंग्लंडची 75 टक्के पेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झाली आहे. ढाका, पॅरिस, लंडनसारख्या शहरांमध्ये चित्रपटाची शूटिंग होणार आहे. ALSO READ : बाबा का अहंकार बढ रहा है...पण का? उत्तर हवे असेल तर पाहा, परिणीती चोप्राचा ‘हा’ व्हिडिओ!!'नमस्ते इंग्लंड'च्या आधी परिणीती आणि अर्जूनचा 'संदीप और पिंकी फरार' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित आहे. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. दिबाकर बॅनर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटातीची गोष्ट एका कॉरपोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलीची आहे. जो आपल्या ध्येयाला घेऊन खूप फोक्स्ड असते. अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 4 वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.