Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गायब आहे अर्जुन कपूर? बहिणीसोबत शेअर केला व्हिडीओ; म्हणाला, "स्वत:ला रिचार्ज..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 09:26 IST

अर्जुन कपूरने व्यक्त केल्या भावना, सध्या काय करतोय अभिनेता?

'इश्कजादे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अर्जुन कपूरने इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं. त्याने '२ स्टेट्स','गुंडे','सिंघम अगेन','हाफ गर्लफ्रेंड' असे अनेक हिट सिनेमे दिले. २०२४ साली आलेल्या रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मधील खलनायकी भूमिकेमुळे त्याचं कौतुक झालं. नंतर तो 'मेरे हसबंड की बीवी' सिनेमात दिसला. त्यानंतर त्याचा एकही प्रोजेक्ट आलेला नाही. सध्या तो बहीण अंशुला कपूरसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. याची झलक त्याने सोशल मीडियावर दाखवली आहे.

अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही बीटाऊनमधील सर्वात चर्चेतील बहीण भावाची जोडी. दोघांनी नुकतंच ऑस्ट्रियामधील निसर्गरम्य वातावरणात निवांत वेळ घालवला. त्यांचा हा व्हिडीओ 'सिबलिंग गोल्स' सेट करणारा आहे.  बहीण भावाच्या मस्तीचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 'रिसेट अँड रेडी' असं कॅप्शन अर्जुनने दिलं आहे. 


आणखी एक पोस्ट करत तो म्हणतो, "गेले काही दिवस मी फक्त निवांत वेळ घालवला. कसलीही घाई नाही, कॅलेंडर पाहून कुठलंही शेड्युल बनवणं नाही...मी फक्त ती वेळ एन्जॉय करत होतो. हलका होत होतो, रिचार्ज झालो आणि आता पुन्हा नवीन कामासाठी सज्ज झालो आहे. तसंच हा वीक मी अंशुलाशिवाय घालवूच शकलो नसतो."


अर्जुन कपूर आगामी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन सिंगल लाईफ जगत आहे. सध्या त्याच्या या व्हिडीओ चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :अर्जुन कपूरबॉलिवूडसोशल मीडिया