Join us

अरिजित म्हणतोय,‘हमका माफी दैदो भैय्याजी...!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 10:40 IST

 कुणाच्याही अध्यात ना मध्यात नसणारा गायक अरिजित सिंग एवढी कुणाची माफी मागतोय असे तुम्हाला वाटले असेल ना? तर तुम्ही ...

 कुणाच्याही अध्यात ना मध्यात नसणारा गायक अरिजित सिंग एवढी कुणाची माफी मागतोय असे तुम्हाला वाटले असेल ना? तर तुम्ही विचार करताय ते अगदी खरंय. ‘आशिकी २’ फेम अरिजित सिंग हा भाई सलमान खानची फार आत्मियतेने माफी मागतोय.त्याला असे झाले की, एका संगीत सोहळ्यात अरिजितने सलमानला क्र ॉस के ले. ते भाईला कसे आवडेल? सलमान काही सहज त्याला माफ करेल असे वाटत नाही. अरिजित सतत त्याची सल्लूमियाँ माफी मागतोय पण त्याने माफ केले तर शप्पथ..अरिजितने ‘सुल्तान’ चित्रपटासाठी एक गाणे गायले आहे. तर अरिजितची इच्छा आहे की, ते गाणे राहू देण्यात यावे.त्याच्या गाण्याच्या लायब्ररीत सलमानवर गायलेले एक तरी गाणे असावे असे त्याला वाटतेय. तो म्हणतो,‘ प्लीज डू नॉट रिमुव्ह द साँग दॅट आय सँग फॉर यू इन सुल्तान. यू वॉन्ट एनीवन एल्स टू सिंग धीस साँग, आय हॅव्ह इनफ साँग्ज सर. बट आय वॉन्ट टू रिटायर विथ अ‍ॅट लिस्ट वन साँग आॅफ यू किपींग इन माय लायब्ररी. प्लीज डू नॉट टेक अवे धीस फिलिंग.’