Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आशिकी २'नंतर अरिजित, मिथून आणि मोहित सूरी त्रिकूट पुन्हा एकत्र! 'सैयारा'मधील 'धुन' गाण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:22 IST

सैयारा सिनेमातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

मोहित सूरी आणि मिथून यांच्या मैत्रीला आता २० वर्षे पूर्ण झाली आहेत.  २००५ मध्ये जहर आणि कलयुग या सिनेमांपासून हे दोघे संगीतक्षेत्रात एकत्र काम करत आहेत. त्यांनी मर्डर 2, आशिकी 2, एक विलन, हमारी अधूरी कहानी, हाफ गर्लफ्रेंड, मलंग आणि आता सैयारा सारख्या हिट संगीत अल्बमवर एकत्र काम केलं आहे. सैयारा सिनेमानिमित्त मोहित, मिथून आणि त्यांच्या जोडीला अरिजीत सिंग हे त्रिकूट पुन्हा एकत्र काम करत आहे.

अरिजित सिंग हा भारतातील सर्वोत्तम गायकांपैकी एक मानला जातो. अरिजीतने मोहित सूरीसोबत हृदयाला स्पर्शणारी गाणी गायली आहेत. तुम ही हो, चाहूं मैं या ना, हम मर जाएंगे (आशिकी 2), हमदर्द (एक विलन), हमारी अधूरी कहानी, फिर भी तुमको चाहूंगा (हाफ गर्लफ्रेंड), चल घर चलें (मलंग), आणि आता धुन (सैयारा). धुन या श्रवणीय गाण्यामुळे पुन्हा एकदा या त्रिकुटाची जादू अनुभवायला मिळतेय.

सैयारा ही एक अत्यंत सुंदर प्रेमकथा आहे, ज्यामध्ये पहिल्यांदाच यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी एकत्र आले आहेत. या चित्रपटाला सध्या नवोदित कलाकारांची गूढ केमिस्ट्री आणि प्रभावी अभिनय यामुळे भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटामध्ये अहान पांडे यशराज फिल्म्सचा नवा हिरो म्हणून पदार्पण करत आहे, तर अनीत पड्डा, जी बिग गर्ल्स डोंट क्राई  मालिकेतून खूप लोकप्रिय झाली, तिला नवी YRF हिरोईन म्हणून सादर केली जात आहे. हा सिनेमा १८ जुलै २०२५ रोजी सैयारा हे चित्रपट जगभरात प्रदर्शित करत आहेत.

टॅग्स :अरिजीत सिंहमोहित सुरीबॉलिवूड