Arijit Singh: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह हा त्याच्या आवाजासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या सुमधुर आवाजाने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं आहे. फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात त्याचे चाहते आहेत. आता हा गायक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत शेकडो गाणी गाणाऱ्या या गायकाने निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आणि चाहत्यांना धक्काच बसला. यापुढे पार्श्वगायन करणार नसल्याचं जाहीर केलं.
अरिजीत हा इंडस्ट्रीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे, परंतु अरिजीत त्याच्या गाण्यांव्यतिरिक्त त्याच्या साधेपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अरिजीत सिंहला रस्त्यांवर पायात चप्पल, हातात कापडी थैली अशा अवस्थेत स्पॉट करण्यात आलंय. शिवाय अरिजीत सिंह बऱ्याचदा ट्रेन किंवा बसने प्रवास करताना दिसला आहे.
दरम्यान, अनेक सेलिब्रिटी आपल्या भविष्यासाठी पैसे कमावण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट उघडतात. मात्र, अरिजीत सिंगने अनेकांपुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. अरिजीत सिंगने गोर-गरिबांचा विचार करुन एक हॉटेल सुरू केलं आहे. जिथे त्यांना फक्त ४० रुपयांत एक व्यक्ती पोटभर जेवण करु शकेल.
कुठे आहे अरिजीत सिंहचं हे हॉटेल?
अरिजीत सिंहचं हे हॉटेल मुर्शिदाबादमधील जियागंज येथे आहे. या हॉटेलचं नाव ‘हेशेल’आहे. जिथे अवघ्या ४० रुपयांमध्ये गरम, पोटभर जेवायला मिळतं. येथे सामान्य माणूसही आदराने बसून जेवण करू शकतो.
देशातील यशस्वी आणि प्रसिद्ध गायकांमध्ये अरिजीतचं नाव अग्रस्थानी आहे. 'सावंरिया' या हिंदी चित्रपटामध्ये प्ले बॅक सिंगर म्हणून काम करत त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. त्यानंतर 'आशिकी- २' मधील 'तुम ही हो' या गाण्यामुळे अरिजीत रातोरात स्टार बनला. सुमधूर गाणी आणि काळजाला भिडणारा आवाज ही त्याची खासियत आहे.
Web Summary : Singer Arijit Singh, known for his melodious voice, has opened a restaurant in Murshidabad where the poor can eat a full meal for just ₹40. Named 'Heshel,' the initiative showcases his simplicity and commitment to helping others, setting a new standard.
Web Summary : अपनी मधुर आवाज के लिए प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह ने मुर्शिदाबाद में एक भोजनालय खोला है जहाँ गरीब लोग सिर्फ ₹40 में भरपेट भोजन कर सकते हैं। 'हेशेल' नामक यह पहल उनकी सादगी और दूसरों की मदद करने की प्रतिबद्धता को दर्शाती है, जो एक नया मानक स्थापित करती है।