Join us

युट्यूबर आशिष चंचलानी आणि एली अवराम करताहेत एकमेकांना डेट?, अखेर समोर आलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 19:35 IST

युट्यूबर आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Eli Avram) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. पण अखेर ते दोघे खरोखर एकमेकांना डेट करत आहेत का, यामागचं सत्य समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी युट्यूबर आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Eli Avram) यांनी एक रोमँटिक फोटो शेअर केला होता. त्यावर त्यांनी कॅप्शन लिहिले होते 'फायनली'. यानंतर ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले. पण अखेर ते दोघे खरोखर एकमेकांना डेट करत आहेत का, यामागचं सत्य समोर आलं आहे.

आशिष चंचलानी आणि एली अवरामने रोमँटिक फोटो शेअर केल्यानंतर आणखी एक फोटो समोर आला, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की आम्ही तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. त्यामुळे चाहत्यांना वेगवेगळे प्रश्न पडू लागले की दोघे खरोखरच रिलेशनशीपमध्ये आहेत की हे आगामी प्रोजेक्टची हिंट देत आहे. अखेर आज हे गूढ उलगडले आहे. खरंतर हे एका म्युझिक व्हिडीओचं प्रमोशन होतं. आशिष आणि एली 'चंदनिया' नावाच्या म्युझिक व्हिडीओसह एकत्र आले आहेत. हे गाणे १९ जुलैला रिलीज झाले आहे.

चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स या प्रँकवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले, "चाहत्यांना कसे कापायचे, कोणीतरी आशिष चंचलानीकडून शिकले पाहिजे.. पण हे गाणे जबरदस्त आहे." गायक अर्जुन कानुनगोने व्हिडीओवर कमेंट केली, "मी लग्नासाठी माझी शेरवानी आधीच खरेदी केली होती."

कोण आहे आशिष चंचलानी?आशिष चंचलानी हा एक लोकप्रिय भारतीय विनोदी कलाकार आणि अभिनेता आहे. तो त्याच्या विनोदी व्हिडीओ आणि विडंबनांसाठी ओळखला जातो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या विनोदी रेखाचित्रे आणि व्यक्तिरेखांद्वारे त्याने ओळख मिळवली आहे.

एली अवरामच्या वर्कफ्रंटबद्दलएली अवराम ही मुंबईत राहणारी स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री आहे. २०१३ मध्ये बिग बॉस ७मध्ये सहभागी झाल्यानंतर तिला भारतात ओळख मिळाली. तिने मिकी व्हायरस, किस किस को प्यार करूं, नाम शबाना आणि गुडबाय सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

टॅग्स :एली अवराम