अरबाज म्हणतो,‘मलायकाबद्दल मी पझेसिव्ह!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 21:48 IST
अरबाज खान आणि मलायका अरोरा खान हे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या रंगत असताना अरबाजने मलायकाविषयी असे काही सांगितले की, ...
अरबाज म्हणतो,‘मलायकाबद्दल मी पझेसिव्ह!’
अरबाज खान आणि मलायका अरोरा खान हे घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या रंगत असताना अरबाजने मलायकाविषयी असे काही सांगितले की, शेकडो हृदये क्षणार्धात घायाळ झाली.१७ वर्षांच्या सुखी संसारानंतर आता एका मुलाखतीदरम्यान अरबाज म्हणतो,‘ मी मलायकाविषयी पझेसिव्ह मी कधीच नव्हतो. पण जसा काळ बदलला तसा माझ्यातही बदल होत गेला. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा मिळवता तेव्हा तिला स्वत:पासून दूर करणे हा विचारच तुम्हाला अस्वस्थ करतो. माझे मलायकावर प्रेम आहे पण मला तिला गमवायचे नाहीये. ती खुपच सुंदर आणि माझी जिवलग आहे. या जगात मी सर्वांत जास्त तिच्यावर प्रेम करतो. तिला गमवायची मला भीती वाटते.’