Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगीतकार ए. आर. रेहमान यांना मातृशोक; करीमा बेगम यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 19:29 IST

वडील व संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केलं. वडिलांच्या निधनाच्या वेळी रेहमान फक्त नऊ वर्षांचे होते. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असं रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं.

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या सोमवारी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रेहमान यांनी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत निधनाची बातमी सांगितली. गायिका श्रेया घोषाल, दिग्दर्शक शेखर कपूर, गायक-संगीतकार सलीम मर्चंट, दिग्दर्शक मोहन राजा, गायिका हर्षदीप कौर यांच्यासह कलाक्षेत्रातील अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला.

वडील व संगीतकार आर. के. शेखर यांच्या निधनानंतर आई करीमा यांनीच रेहमान यांचं संगोपन केलं. वडिलांच्या निधनाच्या वेळी रेहमान फक्त नऊ वर्षांचे होते. आपल्यातील संगीताची आवड व जाण ही सर्वांत आईनेच ओळखली, असं रेहमान यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. 

करीमा यांचे खरे नाव कस्तुरी होते. रेहमान यांनी आपले दिलीप कुमार हे नाव बदलून जेव्हा रेहमान केले होते, त्यावेळी करीमा यांनीही आपले नाव बदलले होते.

टॅग्स :ए. आर. रहमान