Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंडस्ट्रीमध्ये सुशांतची इमेज आणि करिअर खराब करण्यासाठी चालवले जात होते कॅम्पेन, फिल्ममेकर अपूर्व असरानीचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:19 IST

''सुशांत सिंग राजपूतसाठी माझा लढा हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही.''

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर इंडस्ट्रीमधील अनेक गोष्टींचा खुलासा रोज होतायेत. फिल्ममेकर अपूर्व असरानी सुशांत सिंग राजपूतबाबत नव्या गोष्टींचा खुलासा केला आहे. ट्विटरवर असरानी लिहितो, सुशांत सिंग राजपूतसाठी माझा लढा हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही. मी यासाठी आवाज उठवतो आहे कारण मला माहिती होते सुशांत कोणत्या परिस्थितीतून जात होता. त्याची इमेज खराब करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये एक कॅपेन चालवले जात होते. या विषयावर बरेच ब्लॉग लिहिले कारण मला असे वाटते की, ट्विट केल्याने त्याला न्याय मिळणार नाही. अपूर्वाने आपल्या ब्लॉगच्या लिंकसुद्धा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्याने अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 30 पेक्षा जास्त लोकांचा जबाब नोंदवला आहे. सुशांतचे फॅन्सचे म्हणणे आहे की त्याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. मुंबई पोलीस सुशांतच्या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार पोलिसांनी सुशांतच्या बिल्डिंगची CCTV रेकॉर्डिंग ताब्यात घेतली आहे. आता पोलीस फॉरेंन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा करत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत