Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक बच्चन सोडून अमिताभ बच्चन यांच्यासोबत कुटुंबातील सर्वांनी घेतली कोरोनाची लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:33 IST

कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासोबत लसीचा पहिला डोस घेतला आहे.

कोरोनाच्या जाळ्यात बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या अडकली होती. कोरोनावर यशस्वीपणे मात करून बच्चन कुटुंब पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात अमिताभ बच्चन यांनी आपल्या कुटुंबासोबत लसीचा पहिला डोस घेतला आहे. ही माहिती बिग बींनी ब्लॉगद्वारे दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून पहिली लस घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले की, लसीकरण झाले असून सर्व काही ठीक आहे. काल कुटुंब आणि सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झाली होती. त्याचा रिझल्ट आज आला. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. त्यामुळे लसीकरण करण्यात आले आहे. अभिषेक वगळता कुटुंबातील सर्व सदस्यांना लस देण्यात आली आहे. परंतु, अभिषेक बच्चन मुंबईच्या बाहेर असल्याने त्याला लस देण्यात आली नाही.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ट्विटरवर दिलेल्या प्रतिक्रीयेत त्यांनी म्हटले आहे की, दुसरी शस्त्रक्रियाही चांगली झाली असून आता आमच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉ. हिमांशु मेहता यांच्या कौशल्याबद्दलही त्यांनी कौतूक केले होते. आता यापूर्वी जे पहायला मिळाले नव्हते तेही पहायला मिळेल असेही बच्चन यांनी या संदेशात नमूद केले आहे. पूर्वी आपल्याला दिसण्यात बराच प्रॉब्लेक यायचा पण आता दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर आपण रंग आणि आकार व्यवस्थीत ओळखू शकतो असेही बच्चन यांनी म्हटले आहे.

बच्चन कुटुंबासमवेत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी करोनाची लस घेत आहेत. अभिनेता सैफ अली खान, सलमान खान, रोहित शेट्टी, हेमा मालिनी, मलायका अरोरा अशा बऱ्याच कलाकारांनी कोरोनाची लस घेतली आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चन