Join us

अनुष्काच्या ‘फिल्लौरी’चे शुटींग पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 16:29 IST

अनुष्काच्या ‘फिल्लौरी’चे शुटींग पूर्णअभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या होम प्रॉडक्शनने तयार केलेल्या ‘फिल्लौरी’चे पंजाबमधील शुटींग पूर्ण झाले. इन्स्टाग्रामवर अनुष्काने या संदर्भात माहिती दिली.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या होम प्रॉडक्शनने तयार केलेल्या ‘फिल्लौरी’चे पंजाबमधील शुटींग पूर्ण झाले. इन्स्टाग्रामवर अनुष्काने या संदर्भात माहिती दिली. या चित्रपटात दिलजित दोसांज, सूरज शर्मा, मेहरीन पिरझादा आणि अनुष्का यांच्या भूमिका आहेत. क्लीन स्लेट फिल्म्स याचे सहनिर्माता आहोत. अनुष्काचा होम प्रॉडक्शन, भाऊ कर्नेश शर्मा आणि फॉक्स स्टुडिओज यांच्या बॅनरखाली फिल्लौरी हा विनोदी, प्रणयप्रधान हिंदी चित्रपट आहे.‘आम्ही औत्सुक्यपूर्ण असणाºया भागाचे शुटींग पूर्ण केले. पंजाबमध्ये उन्हाळ्यात आणि इतर निसर्गरम्य ठिकाणी याचे शुटींग केले. फिल्लौरीचे पोस्ट प्रॉडक्शन आता मुंबईत होईल. आता पुढील प्रक्रियेसाठी आम्ही तयार असल्याचे कर्नेशने सांगितले.नवोदित अन्शाई लाल यांनी याचे दिग्दर्शन केले असून, अन्विता दत्त यांची कथा आहे. यावर्षीच्या बैसाखीपासून चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती. क्लीन स्लेटने यापूर्वी ‘एन. एच. १०’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यात अनुष्का आणि नील भूपालम यांच्या भूमिका होत्या.