Join us

‘सुल्तान’ मधील अनुष्काचा इमोशनल स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 08:52 IST

बॉलीवूडमध्ये अनुष्का शर्माने ‘बँड बाजा बारात’ मधून डेब्यू केला. त्यानंतर तिने मोजकेच चित्रपट केले पण, प्रत्येक चित्रपटाने बॉलीवूडमध्ये आपली ...

बॉलीवूडमध्ये अनुष्का शर्माने ‘बँड बाजा बारात’ मधून डेब्यू केला. त्यानंतर तिने मोजकेच चित्रपट केले पण, प्रत्येक चित्रपटाने बॉलीवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडली. सध्या ती चांगलीच फॉर्मात आहे.‘सुल्तान’ मुळे ती पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे. मध्यंतरी, विराट आणि तिच्या रिलेशनमधील दरी वाढत तर गेलीच पण तिचे बॉलीवूडशी ही नाते खुप दुरावत गेले. पण आता सलमान सोबत तिचे नाव जोडले जात असल्याने ती खुपच खुश आहे.काल सलमानचा ‘सुल्तान’मधील एक स्टील फोटो व्हायरल झाला होता. आता आज अनुष्काचा चित्रपटातील एक स्टील फ ोटो अपलोड झाला आहे. या फोटोत ती भारताचा तिरंगा हातात घेऊन मेडल जिंकल्याचा आनंद व्यक्त करत आहे.तिने सुल्तान मध्ये ग्रॅपलरची भूमिका केली आहे. तिने या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी अत्यंत मेहनत घेतली आहे. शारीरिक प्रशिक्षणांतर्गत विविध कौशल्यांना पार करत ती चित्रपटासाठी तयार झाली होती. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा हा चित्रपट ‘ईद’ ला रिलीज होणार आहे.