Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ युवीच्या लग्नात अनुष्का-विराट करणार का ‘खास’ घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 16:49 IST

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. युवी व हेजलच्या या लगीनघाईमध्येच ...

क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. युवी व हेजलच्या या लगीनघाईमध्येच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांबद्दलही चर्चा रंगलीयं. होय,  येत्या ३० तारखेला युवराज आणि हेजल शीख धर्माच्या रुढी-परंपरांनुसार विवाहबद्ध होणार आहेत. युवी-हेजलच्या या लग्नसोहळ्यात विविध कलाकार आणि क्रिकेटपटूही हजेरी लावणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  अनुष्काला सुद्धा या लग्नाचे निमंत्रण मिळालेयं. आता विराट आणि युवराजची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे विराट युवीच्या लग्नाला जाणार यात शंकाच नाही. पण विराटसोबत अनुष्काही युवी-हेजलच्या लग्नाला हजेरी लावणार आहे, अशी सध्या जोरदार चर्चा आहे. केवळ एवढेच नाही तर या लग्नात विराट व अनुष्का आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचेही ऐकू येतेय.अगदी अलीकडे विराट व अनुष्का यांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. पण यानंतर दोघांनीही काही काळ ब्रेक घेतला असल्याचे स्पष्ट झाले. यापश्चात विराट व अनुष्का दोघेही गोव्यात एका इव्हेंटमध्ये एकत्र दिसले. यावरून दोघांचेही नाते तकलादू नाही, हेच दिसले. सध्या तरी  अनुष्का व विराट यांच्यात सगळे आॅल-वेल सुरु आहे. दोघेही परस्परांसोबत वेळ घालवताना दिसताहेत. यावरून दोघेही आपल्या नात्याची अधिकृत घोषणा करतील, असा अंदाज बाधला जात आहे. खरे तर हा अंदाज आहे आणि अंदाज चुकूही शकतो. पण आमची आणि विराट व अनुष्काच्या तमाम चाहत्यांची हा अंदाज चुकू नये, अशीच इच्छा आहे. त्यामुळेच सध्या युवीच्या लग्नाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेय.