Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 14:42 IST

विराटचा काल पासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो निवृत्तिनंतर तो कुठे असेल, काय करेल हे सांगताना दिसतोय.

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून दूर आहे. फेब्रुवारी महिन्यात तिने दुसऱ्या बाळाला 'अकाय' ला जन्म दिला. आता ती दोन्ही मुलांच्या संगोपनात व्यस्त झाली आहे. तर दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) आयपीएलमध्ये व्यस्त आहे. मागच्या महिन्यातच अनुष्का भारतात परतली. दरम्यान विराटचा काल पासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो निवृत्तिनंतर तो कुठे असेल, काय करेल हे सांगताना दिसतोय. यामध्ये तो ही देखील हिंट देतो की रिटायरमेंट घेतल्यानंतर तो काही दिवस कोणालाच दिसणार नाही अशा ठिकाणी जाईल. याचा अर्थ अनुष्का आता बॉलिवूडमध्ये दिसणार नाही का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला लंडनमध्ये अकायला जन्म दिला. लेकाला परदेशात जन्म दिल्याने आता कोहली कुटुंब परदेशातच स्थायिक होणार का ही चर्चा तेव्हापासूनच सुरु झाली होती. तसंच मुलांच्या जन्मानंतर करिअर सोडणार हे देखील अनुष्काने याआधीच स्पष्ट केलं होतं. आता विराट कोहलीच्या या निवृत्तिनंतरच्या प्लॅनिंगबद्दल समजल्यानंतर अनुष्काही अभिनयापासून दूर जाणार का या चर्चांना उधाण आलं आहे. 

अनुष्का शर्माचा झुलन गोस्वामीवर आधारित 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं शूट कधीच पूर्ण झालं तरी अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही. सध्या ती केवळ दोन्ही मुलांकडे लक्ष देत आहे. शिवाय विराटला पाठिंबा देण्यासाठी ती स्टेडियममध्येही येते. अशात अनुष्का पुन्हा स्क्रीनवर दिसण्याचे चान्सेस कमीच आहेत.

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीबॉलिवूड