Join us

पार्टीत डान्स करताना दिसली विराट-अनुष्काची लेक वामिका, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 18:49 IST

विराट आणि अनुष्का यांच्या लेकीचा म्हणजेच वामिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. आदर्श कपल म्हणून विरुष्काकडे पाहिलं जातं. त्या दोघांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी स्टेडियममधील तर कधी एअरपोर्टवरील व्हिडिओमध्ये विरुष्काची झलक पाहायला मिळते. आता विराट आणि अनुष्का यांच्या लेकीचा म्हणजेच वामिकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

लेक वामिकाला विराट-अनुष्का पापाराझी आणि सोशल मीडियापासून दूर ठेवतात. आजपर्यंत त्यांनी आपल्या लेकीचा चेहराही दाखवलेला नाही. पण, आता एका पार्टीतील वामिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका पार्टीतील हा व्हिडिओ असून यामध्ये वामिका डान्स करताना दिसत आहे. वामिकाला पाहून करीना कपूर तिला चिअर करताना दिसत आहे.

याबरोबरच वामिकाचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. यामध्ये ती तिच्या भावंडांसोबत दिसत आहे. या फोटोत वामिकाच्या चेहऱ्यावर इमोजी टाकण्यात आला आहे. 

अनुष्का आणि विराटने २०१७ साली लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंनतर ४ वर्षांनी अनुष्काने लेक वामिकाला जन्म दिला. येत्या ११ जानेवारीला वामिकाचा तिसरा वाढदिवस आहे. यादरम्यानच विराट-अनुष्का पुन्हा आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीऑफ द फिल्डविरूष्का