Join us

रणबीर कपूरने सगळ्यांसमोर केलेल्या घाणेरड्या वर्तणुकीवर चांगलीच वैतागली अनुष्का शर्मा, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 21:56 IST

'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील रणबीर कपूरचे वर्तणूक पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील रणबीर कपूरचे वर्तणूक पाहून तुम्ही अवाक् व्हाल. या व्हिडीओत पहायला मिळतेय की, रणबीर कपूर सगळ्यांसमोर घाणेरडापणा करताना दिसतो आहे. ते पाहून त्याच्यावर अनुष्का शर्मा चांगलीच वैतागलेली दिसते आहे. 

रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी 'ए दिल है मुश्किल', 'संजू' आणि 'बॉम्बे वेलवेट' या तीन चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. तसेच त्या दोघांचे ऑफस्क्रीन नातेही खूप चांगले आहे. 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका कार्यक्रमात या दोघांनी खूपच धमाल केली होती.

नुकताच या दोघांचा या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 'ए दिल है मुश्किल'च्या प्रमोशनदरम्यान दोघांची मुलाखत सुरू आहे. त्यावेळी रणबीर सतत नाकात बोट घालताना दिसतो. एका क्षणी रणबीरने नाकात बोट घातल्यानंतर ते बोट तो अनुष्काच्या कपड्यांना पुसले. त्याचा हा घाणेरडापणा पाहून अनुष्का त्याच्यावर चांगलीच वैतागताना दिसली आहे. ती म्हणते की, 'हा मुलगा असाच वागतो... सतत नाकात बोट घालतो आणि अशा प्रकारे तो पुसतो.'

अनुष्का पुढे म्हणतेय, 'आता तरी निदान शांत बसशील का तू? मी जे कपडे घातले आहेत ते भाड्याचे आहेत.' पुढे कोट हातात घेऊन म्हणते, 'अरे हे नाही. हे माझे स्वतःचे आहेत.' यावर रणबीर तिची मस्करी करत म्हणतो, ' हा तुझा कोट तर डॉक्टरांच्या कोटसारखा दिसतोय.' 

टॅग्स :रणबीर कपूरअनुष्का शर्मा