Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अनुष्का शर्मा ‘ट्रोल’; ‘त्या’ फोटोंबद्दल नेटिझन्स म्हणाले,‘डोन्ट शो आॅफ’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 13:48 IST

सध्या बॉलिवूडचे सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. चांगल्या गोष्टींच्या प्रसारासाठी जरी सोशल मीडिया ...

सध्या बॉलिवूडचे सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. चांगल्या गोष्टींच्या प्रसारासाठी जरी सोशल मीडिया एक उत्तम माध्यम असेल तरीही कधीकधी त्यामुळे बदनामीच जास्त होते. अलिकडेच अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत असंच काहीसं घडलं. आपल्या व्यग्र कामकाजातून वेळ काढून स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालेली अनुष्काच सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. नेटिझन्सच्या विविध कमेंटसनी एवढी हैराण झाली की, तिची डोकेदुखी वाढलीये.काही दिवसांपूर्वीच अनुष्का पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाशी जोडली गेली. त्याअंतर्गत तिने गुरुवारी वर्सोवा बीचवर स्वच्छतेची मोहीम राबवली. बीचवरचा कचरा उचलतानाचा फोटो अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आणि नेटिझन्सना हेच कारण मिळालं. फक्त प्रसिद्धीसाठी हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं, असे कमेंट्स तिच्या फोटोवर येऊ लागले. तर काहींनी साफसफाई करण्याऐवजी फोटोशूट करत बसल्याचा आरोपही तिच्यावर लावला.                               अनुष्काने तिच्या फोटोसोबत एक भली मोठी कॅप्शनसुद्धा दिले होते. स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करणारी ही कॅप्शन होती. मात्र, स्वच्छतेपेक्षा तिने लोकांना ज्ञान देण्यातच आपला वेळ घालवला, अशीही कमेंट एका नेटिझनने दिली. आपण राबवलेल्या अभियानानंतर ट्रोल केले जाऊ अशी अपेक्षाही अनुष्काने केली नसेल. तशी ती एकदम शांत आणि सुस्वभावी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण, पाहूया ती आता यावर नेटिझन्सना काय उत्तर देते ते...