Join us

तोंडात नोटा घेऊन नाचली अनुष्का शर्मा, लग्नाच्या रिसेप्शनमधला व्हिडिओ तुफान व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 12:21 IST

लग्नाच्या वेळी डान्स, गाणं आणि मजा मस्ती हे सगळ तर डान्स फ्लोअरवर होणं सहाजिकच आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी काल दिल्लीत पार पडला.

लग्नाच्या वेळी डान्स, गाणं आणि मजा मस्ती हे सगळ तर डान्स फ्लोअरवर होणं सहाजिकच आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी काल दिल्लीत पार पडला. यावेळी अनुष्काने  टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन सोबत जोरदार ठुमके लावले. या रिसेप्शन पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक जणांनी हजेरी लावली होती. आधी तर अनुष्का आणि विराटने आलेल्या पाहुण्यांसोबत फोटोसेशन केले आणि यानंतर दोघे ही डीजे तालावर थिरकण्यासाठी डान्स फ्लोअरवर आले. विरुष्काच्या पेजवर त्यांचा डान्स व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे अनुष्का यात विराटसोबत नाही तर क्रिकेटर शिखर धवनसोबत डान्स करताना दिसते आहे. ऐवढेच नाही तर अनुष्का तोंडात नोट पकडून डान्स करताना दिसते आहे. अनुष्काने पंजाबी स्टाइलमध्ये ओठ दाबून नाचायला सुरुवात केली आणि एकच समा बांधून टाकला.  दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला.